सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
करंजेतर्फ सातारा येथील एका घराचे बांधकामातील उभे असलेले कॉलमचे 30 हजारांचे लोखंडी चार बार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबतची फिर्याद 16 फेब्रुवारीला शहनाज इस्माईल शेख (रा. कोंडवे ता.जि. सातारा) यांनी दिली शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी भंगार दुकानदारांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयब अशपाक शेख (वय- 27, रा. 411 करंजेपेठ, सातारा) आणि राजेश जगन घाडगे (वय- 30, रा. भोंदवडे, पो. गजवडी, ता. सातारा, मूळ रा. सैदापूर) अशी संशयित आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास एका संशयित दि. 3 मार्च रोजी त्याचे राहते घरी करंजे येथे आला असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने करंजे येथे संशयिताचे घराचे परीसरात जावून नमुद संशयित इसमास चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर इसमाने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलीसांनी कौशल्याने तपास केला असता नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. सदरचा माल सज्जनगड जाणारे रोडला एका भंगार विक्री करणा-या भंगार व्यवसायिकास विकल्याची माहीती दिली.
सदरचे माहीतीवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने भंगार व्यवसायिक आरोपीचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले. नमुद आरोपीकडुन गुन्हयातील चोरीचा 30 हजार रूपयांचा लोखडी बार व त्याने गुन्हयातील चोरलेले लोखंडी बार वाहून नेणेसाठी वापरलेले मालवाहू वाहन टेम्पो असा एकूण 2 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पो. हे. कॉ. विजय भिंगारदेवे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो.हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो.ना. अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत व पो.हे.कॉ. विजय भिंगारदेवे यांनी केली आहे.