1 ऑगस्टपासून सातारा अनलॉक; काय सुरु, काय बंद राहणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात अंशत: लावलेला लॉकडाऊन 1 ऑगस्ट पासून उठवला जात असल्याचे आदेश काढून यात जवळपास सर्वच दुकाने उघडी करण्याची परवानगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. या परवानगीनुसार दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व दुकाने उघडी ठेवताना नियम व अटी शर्ती लागू करण्यात आले असून यात 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वयोवृध्द लोकांना, गरोदर मातांना आणि लहान मुलांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मात्र सातारा जिल्ह्यातील एसटी बसेस पन्नास टक्के क्षमतेसह सुरु करण्याबाबत सवलत देण्यात आली असून सर्व धार्मिक स्थळांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच हॉटेल रेस्टॉरंट बार यांनाही बंदी कायम ठेवली आहे.

1 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट पर्यंतची लॉकडाऊन बाबतचे जिल्हाधिका-यांचे आदेश पुढील प्रमाणे :

65 वर्षापेक्षा जास्त वयोवृध्दांना, लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना अत्यावश्यक कारणाव्यतरिक्त बाहेर येण्यास मज्जाव
चित्रपटगृह, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, जिम, गार्डन यांना बंदी
मान्यता असलेल्या रेल्वे गाड्या आणि विमान सेवा वाहतूकीला परवानगी
सर्व सामाजिक ,राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद
हॉटेल रेस्टॉरंट बंद परंतु घरपोच सेवा सुरु
सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्था बंद परंतु शिक्षक कर्मचारी वर्गाला सूट
बाहेरच्या जिल्ह्यातून आत येण्यास अथवा बाहेर जाण्यास परवानगी नाही


काय काय सुरु होणार
महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेल्या सर्व दुकानांना परवानगी
जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक पन्नास टक्याने कपात करुन सुरु करण्यास परवानगी
माल वाहतूकीसाठी जिल्ह्या बाहेर ये जा करण्यास परवानगी
शासकिय अधिकारी, कर्मचारी यांना प्रवास करण्यास परवानगी
दोन चाकी वाहनांना एक प्लस एक हेल्मेट आणि मास्क बंधनकारक
तीन चाकी वाहनांना अत्यावश्यक एक प्लस दोन व्यक्ती
चार चाकी एक प्लस तीन
सर्व मार्केट दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत सुरु राहणार
पाच पेक्षा जास्त ग्राहक दुकानात असतील तर दुकान बंद करावे


5 ऑग्स्ट पासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु राहतील
लग्न कार्य आणि अंतविधीला वीस पर्यंत लोकांना हजर राहण्यास परवानगी
मॉर्निग वॉक आणि ग्राऊंड मध्ये व्यायाम करण्यास परवानगी
वृत्तपत्र घरपोच वाटप करण्यास परवानगी
केस कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर यांना परवानगी
5 ऑगस्ट पासून आऊटडोअर असांघिक खेळांना परवानगी
जिल्ह्यातील सेतू, आधारकेंद्र, महा ई सेवा केंद्र यांना परवानगी
पॅट्रोल पंप, सर्व वैद्यकिय सेवा पुर्णवेळ सुरु ठेवण्यास परवानगी
दंडात्मक कारवाई बाबतचे आदेश
मास्क न लावणा-याना 500 रुपये दंड
खाजगी ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड


दुकानामधील ग्राहकात सहा फुट अंतर नसेल आणि एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असल्यास ग्रामीण भागात 500 रुपये दंड, दुस-यांदा उल्लंघन झाल्यास एक हजार रुपये दंड, तिस-यांदा उल्लंघन झाल्यास परवाना रद्द. शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास एक हजार रुपये दंड, दुस-यांदा उल्लंघन झाल्यास दोन हजार रुपये दंड, आणि तिस-यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना रद्द केला जाणार.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment