सातारा प्रतिनिधी।शुभम बोडके
सातारा शहराच्या पश्चिम भागात ऐन फेब्रुवारी महिण्यातच पाणी टंचाई जाणवु लागली आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागात ज्या तलावातून पाणी पुरवठा केला जातो. तो महादरे तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. तसंच कास धरणातून येणारं पाणी सुद्धा 15 मिनिटे येत असल्यामुळं नागरीकांना पाणी वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळं पेठेतील नागरीक संतप्त झालेत. टॅंकरने आलेलं पाणी घरात नेण्यासाठी सातारकरांना आता रस्त्यावर भांडी घेवून यायची वेळ लागली आहे.
गेल्या अनेक वर्षां पासून महादरे तलावातुन व्यंकटपुरा पेठ, रामाचा गोट तसंच मंगळवार तळे परीसराला पाणी पुरवठा केला जातो. या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक टाकी बांधण्यात आली, मात्र लोकसंख्या वाढीमुळे ही टाकी कमी पडू लागली आहे. तसंच महादरे तलावातलं पाणीच संपल्यामुळं सध्या या भागात पाण्याची कमतरता जाणवती. महादरे तालावातलं पाणी अज्ञातानं सोडुन दिल्यामुळं तलाव कोरडा पडल्याचं लोकांचा आरोप असुन सत्ताधारी या सगळ्याकडं दुर्लक्ष करत असून जाणुन बुजुन लोकांना त्रास दिला जात असल्याची टिका माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी केली आहे. ते म्हणाले, आमच्या वतीन रोज एक टँकर आम्ही सुरु केला असून आता ही परिस्थिती सुधारली नाही. तर लक्षचेधी रास्तारोको करावा लागेल असा इशारा माजी उपगराध्यक्ष अविनाश कदम यांनी दिला आहे.
या पेठेतील बरेचसे नागरीक वयोवृद्ध आहेत. यामुळं आम्हाला पाणी वेळेत मिळालं नाही तर आम्हाला याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय असं नागरीकांनी सांगितलं. टँकर आला तरी आम्हाला बादली उचलण्याची ताकत आता राहिली नाही, असं सुद्धा नागरीकांनी सांगितलय. महादरे तलाव आटला तर त्यात कासचं पाणी सोडावं आणि पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी स्थानिकांनी केली. किमान 45 मिनीटं आम्हाला पाणी मिळावं, अशी मागणी साता-याच्या पश्चिम भागातील नागरिक करात आहेत. नगरपालिकेच्या वतीनं सुद्धा टँकर येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. मात्र, आम्हाला स्वत:च्या नळाला 45 मिनीट हक्काचं पाणी मिळावं अशी मागणी सुद्धा स्थानिक सातारकरांनी केली.