अनर्थ टळला : मलकापूरला चालक बचावला पण डंपरने गाडी चिरडली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
मलकापूर फाटा येथे सुदैवाने दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत उडी टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मलकापूर फाटा येथे दुपारी हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार बचावला असला तरी त्याच्या दुचाकी डंपरखाली चिरडली. या घटनेनंतर काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार- दुचाकीवरील (एमएच- 50- एस- 7032) युवक मलकापूर फाट्यावर दुचाकीवर बसूनच दुकानदारा बरोबर बोलत उभा होता. त्याचवेळी उपमार्गावरून मलकापुरात जाण्यासाठी निघालेल्या डंपर चालकाला वळताना अंदाज न आल्यामुळे दुचाकीला धडक झाली. या वेळी दुचाकीस्वार युवकाने दुचाकी सोडून बाजूला उडी मारली. काही कळण्यापूर्वीच डंपरने दुचाकीला चिरडले.

या वेळी दुचाकीस्वारासह आसपासच्या युवकांनी डंपर चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी हस्तक्षेप करून सर्वांना बाजूला घेतले. या वेळी काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची नोंद उशिरापर्यंत झाली नव्हती. दरम्यान, दुचाकीस्वार धोकादायक वळणावर थांबल्याने अपघात झाला, अशीही घटनास्थळी चर्चा होती.