Satbara Utara : आता घरबसल्या मिळतोय जमिनीचा 7/12 उतारा; फक्त ‘ही’ Trick वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. शेती संधर्भात कोणत्याही सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम जमिनीचा सातबारा उतारा मागितला जातो. गावातील तलाठी कार्यालयात सातबारा उतारा काढायचा म्हंटल तर वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करावा लागतो. आणि हेलपाटे वेगळेच…. परंतु आता चिंता करू नका, आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा काढता येत आहे, आणि ते सुद्धा 1 रुपयाही खर्च न करता. होय, हे खरं आहे. Hello Krushi तुमच्यासाठी ही खास सुविधा घेऊन आले आहे.

हॅलो कृषी हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून तुम्ही घरात बसून सातबारा उतारा, 8 अ उतारा काढू शकता. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना समजेल अशा अगदी सोप्प्या भाषेत आणि सोप्य्या पद्धतीने यावर हे उतारे काढण्याची सोय केली आहे. सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही आणि ecaptcha भरण्याची सुद्धा गरज नाही. याकरिता तुम्हाला नेमकं काय करावं लागेल हे आम्ही खाली सविस्तर सांगितले आहे.

सातबारा मिळवण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे –

1)सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

3) आता Hello Krushi ओपन करा आणि त्यामधील होम पेज वर जाऊन ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

4) त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई -चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. असे 6 विभाग मिळतील यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.

5) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा अमरावती , औरंगाबाद कोकण)

6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. अकोला , गोंदिया , वर्धा .. )

7)आता तालुका निवडा (उदा. काटोल , तिरोडा , बारामती ..)

8)गाव निवडा (उदा. अमानतपूर , करंजे … )

9) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.

त्यानंतर गट नंबर हा पर्याय निवडा , ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा.(येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव,मधले नाव ,सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)

11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.

12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी स्वतःच तुमचा captcha भरेल.

13) त्यानंतर तुमचा सातबारा दिसेल, त्यानंतर ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

1) Hello Krushi अँप वर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.
2) तुम्ही कोणतीही शेतजमीन 1 रुपया सुद्धा खर्च न करता अगदी फुकटात मोजू शकता
3) हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज कळतोय.
4) तुमच्याकडे असलेली जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय थेट खरेदी विक्री करता येते.
5) तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, खत दुकानदार, यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.
6) म्हैस- गाई , कुत्रा यांसारख्या जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येत असल्यामुळे एजंटला जाणारा पैसा वाचतो.
7) महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील प्रत्येक शेतमालाचा रोजचा बाजारभाव चेक करता येतो.
8) शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.

मित्रानो, शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करून शेतकऱ्यांचे काम सोप्प कस करता येईल हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन हॅलो कृषी हे अँप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. यातील सर्व सोयी सुविधेचा लाभ घेण्यासाठी हॅलो कृषी शेतकऱ्यांकडून 1 रुपयासुद्धा घेत नाही. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. आणि सर्व सुविधेचा लाभ घ्या.