हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात मान आणि मत दोन्ही गादीलाच मिळाली… जसं वाटतं होतं अगदी तसंच झालं… पण यात एका माणसाला विसरून चालणार नाही तो म्हणजे बंटी उर्फ सतेज पाटील (Satej Patil) … कोल्हापूरच्या राजकारणात विरोधकांचा कुणी ठरवून कंडका पाडला असेल तर तो बंटी पाटलांनी… भाजपची तगडी फौज असतानाही सगळ्यांना पुरून उरत शाहू छत्रपतींना निवडून आणण्यात कुणाचा मोठा वाटा असेल तर तो बंटी पाटलांचाच… २०१९ मध्ये ज्या संजय मंडलिकांना मदत करत बंटी पाटलांनी खासदार केलं, त्याच मांडलिकाचा पराभव सुद्धा आपण करू शकतो हे सिद्ध करून कोल्हापूरमधली आपली ताकद बंटी पाटलांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलीय… शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक अशी लढत झाली असली तरी चर्चेच्या सेंटर पॉईंटला बंटी पाटीलच का आहेत? कोल्हापूरच्या निकालात बंटी पाटील कसे निर्णायक ठरलेत? तेच पाहुयात
कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्यात बंटी पाटलांनी आघाडी घेतली होती. तस पाहिलं तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची… त्यामुळे शाहू महाराजांनी ठाकरेंच्या मशालीवर महाविकास आघाडीकडून लढावं अशी ठाकरेंची इच्छा होती… परंतु बंटी पाटलांच्या विश्वासावर शाहू महाराजांनी मशालीवर न लढता काँग्रेसच्या हातावर लढणं पसंत केलं. परिणामी ठाकरेंनी शाहू महाराजांचा मान राखत काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली. आता जबाबदरी होती ती बंटी पाटलांची … इतक सगळं केल्यानंतर आता शाहूंच्या विजयासाठी बंटी पाटलांनी कोल्हापूरची सगळी सूत्रे हातात घेतली आणि संपूर्ण कोल्हापूर पिंजून काढला…. निवडणूक जिंकून कशी आणायची याचं पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात आधीपासूनच होतं.. त्यामुळे निकालानंतरच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शाहू महाराजांच्या विजयाचा दावा आधीपासूनच करण्यात आला होता. सतेज पाटलांचा कोल्हापुरातील करिश्मा, अगदी बूथ मॅनेजमेंट पासून केलेलं नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जीवावर शाहू महाराजांचा विजय आता पक्का झाला….
कोल्हापुरातील काँग्रेसचा मताधिक्य जास्त असलेल्या करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात जास्तच्या मतदानाचाही याला फायदा झाला… सतेज पाटील यांच्यासोबत ऋतुराज पाटील, जयश्री पाटील आणि पी एन पाटील यांनी शाहू महाराजांच्या विजयासाठी जीवाचे रान केलं. त्याउलट महायुतीमध्ये एकदिलाने काम झालं नाही असं बोललं जात आहे. त्यातच संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर दत्तक पुत्राचा आरोप केल्यानंतर तर जनतेमध्ये शाहू महाराजांबद्दलची सहानभूती आणखी वाढली आणि त्याचा फायदा शाहू महाराजांना झाला. शाहू महाराजांची इमेज सुद्धा त्यांच्या विजयात महत्वाची ठरली. भाजप आणि मोदी सरकार विरोधात असलेल वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीचे आधीपासून असलेले वलय शाहू महाराजांच्या पथ्यावर पडलं. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेने सुद्धा वार फिरलं आणि परिणामी शाहू महाराजांनी ऐतिहासिक विजय मिळवला….
नेत्यांचं बलाबल बघायचं झालं तर संजय मंडलिकांच्या बाजूने हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, राजेश पाटील, कुटेकर, समरजीतसिंह घाडगे आणि अशी अजून मातब्बर नेत्यांची फौज होती… पण या सगळ्यांना एकटे पुरून उरले ते बंटी पाटील… छत्रपती घराण्यातून असणं हा इमोशनल फॅक्टर असला तरी त्याला मतांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा मोठा टास्क बंटी पाटलांना पार पाडायचा होता… आणि त्यांनी तो यशस्वीपणे पार पाडला देखील…या निकालाने फक्त शाहू छत्रपती दिल्लीत गेले एवढीच गोष्ट घडली नाही तर सोबत बंटी पाटील यांच्या कोल्हापूरच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय… साध्या भाषेत बोलायचं झालं तर येत्या काळात बंटी पाटील या नावाला या विजयामुळे काँग्रेसमध्ये मोठा युएसपी मिळेल, हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाहीच… त्यामुळे कोल्हापुरात बंटी पाटलांनी ठरवलं तर कार्यक्रम होऊन कंडका पडतोच… ही लाईन आणखीन गडद झालीय एवढं मात्र नक्की….