साहित्य
1) पारीसाठी – ५०० ग्रॅम गहू, चिमूटभर मीठ आणि पाणी.
2) सारणासाठी – दीड वाटी ओल्या नारळाचा किस,
3) २ टीस्पून चॉकलेट पावडर,
4) २ टीस्पून किसलेलं डार्क चॉकलेट आणि ४ टीस्पून पिठीसाखर.
कृती – कुरडईच्या सत्त्वाप्रमाणेच गहू 3 दिवस पाण्यात भिजवून वाटून सत्त्व तयार करावे. नंतर सत्त्वाच्या बरोबरीने पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडं मीठ घाला. पाणी उकळल्यावर सत्त्व हलवून त्या पाण्यात घाला. ते सारखं हलवा. मंद आचेवर झाकण ठेवून चिकाला चांगली वाफ घ्यावी. हाताला चिकटणार नाही असा चीक शिजला की गॅसवरून खाली उतरवून घ्यावा.
सारणाचं साहित्य एकत्र करून ठेवावं. चीक गरम असतानाच मोदकाच्या साच्यात लिंबाएवढा गोळा ठेवून त्यात दाबावा. त्यात सारण भरून पारी बंद करून हलक्या हातानं साचा काढावा.
८-१० मोदक तयार झाल्यावर मोदकपात्रात मोदक ठेवून ५-६ मिनिटं उकडावे. गरमागरम मोदक नैवेद्यासाठी ठेवताना वरून फोडून पांढरं लोणी त्यात घालावं. हे मोदक अतिशय स्वादिष्ट लागतात.