जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याला रवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालपद अत्यंत दुर्बल असते, राज्यपालांना पत्रकार परिषद आयोजित करण्याचे अथवा आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याचे अधिकारही नसतात असे वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी मलिक यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, सनदी अधिकारी गिरीश चंद्र मुरमू आणि आर. के. माथुर यांची अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. मुरमू हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत तर माथुर गेल्या नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत.

जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश ३१ ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला होता.

Leave a Comment