हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. यातील पहिले २ सामने पार पडले असून दोन्ही संघानी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. आता या सिरीज मधील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारी पासून राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (SCA Stadium) होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी स्टेडियमचे नाव बदलण्यात येणार आहे. सौराष्ट्र स्टेडियमला माजी क्रिकेटपटू निरंजन शाह (Niranjan Shah) यांचे नाव देण्यात येणार आहे.
भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील तीसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मात्र त्याच्या एक दिवस आगोदर म्हजनेच १४ फेब्रुवारीला खांदेरी येथील स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात येणार आहे. स्टेडियमच्या नवीन नावाचे अनावरण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यावेळी दोन्ही संघांना सामन्याच्या एक दिवस आधी समारंभात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. तसेच बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य आणि सौराष्ट्र संघाचे सदस्यही निमंत्रित यादीत असतील. राजकोट येथील या क्रिकेट स्टेडियम वर पहिल्यांदा २०१३ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत येथे सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले आहेत.
कोण आहेत निरंजन शहा?
निरंजन शाह हे भारतातील सर्वात वरिष्ठ क्रिकेट प्रशासकांपैकी एक आहेत. त्यांनी बीसीसीआयचे सचिव म्हणूनही काम केले आहे. क्रिकेट प्रशासक होण्यापूर्वी निरंजन शाह स्वतः क्रिकेटपटू होते. 1960 च्या मध्यापासून ते 1970 च्या मध्यापर्यंत निरंजन शहा यांनी सौराष्ट्रासाठी 12 प्रथम श्रेणी सामने खेळले. सध्या निरंजन शहा हे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. SCA मध्ये त्यांचा अजूनही लक्षणीय प्रभाव आहे.
भारतात अनेक स्टेडियमची नावे बदलली –
दरम्यान, मागील काही वर्षात देशातील एकही क्रिकेट स्टेडियमची नावे बदलण्यात आली आहे. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नामकरण अरुण जेटली स्टेडियम करण्यात आले. लखनऊमधील एकना स्टेडियमचे नाव बदलून भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियम करण्यात आले. तसेच अहमदाबादच्या सरकार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले.