फक्त 1 रुपया महिन्याला बचत खात्यात जमा करा! नाहीतर 2 लाखाचे होईल नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने गरीब आणि दुर्बल घटकांनाही विम्याचा लाभ मिळावा यासाठी स्वस्तात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) कमी प्रीमियमसह सुरू केली आहे. या योजनेमध्ये पीएमएसबीवाय अंतर्गत खातेधारकांना 2 लाखांचा अपघात जीवन विमा (Life Insurance) मिळणार आहे. तर कायमस्वरुपी अपंगत्व असल्यास 1 लाख रुपये विम्याची रक्कम असणार आहे. दरमहा फक्त 12 रुपये प्रीमियम भरून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

काय आहे योजना ?
PMSBY योजनेसाठी 18 ते 70 अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खातं असणं बंधनकारक आहे. यामध्ये विमा घेणार्‍याचा मृत्यू, अपघात किंवा संपूर्ण अपंगत्व असल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. कायमस्वरुपी अर्धांगवायू असल्यास एक लाख रुपयांचं संरक्षण मिळतं. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही अतिशय फायद्याची योजना आहे. कारण, या योजनेचं वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे.

असा करा अर्ज?
सरकारच्या या खास योजनेमध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी खाते धारक कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर सरकारच्या वेबसाईटवरुनसुद्धा तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

या गोष्टी आहेत महत्वाच्या
PMSBY योजनेसाठी वर्षाला 12 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागणार आहेत. जर प्रीमियम वेळेवर जमा नाही झाला तर पॉलिसी रद्द होऊ शकते. यामध्ये बँक खात्यातून प्रीमियम थेट ऑटो डेबिट करण्याची सुविधा आहे. जेव्हा बँक खात्यात प्रीमियमची कोणतीही रक्कम नसते तेव्हा पॉलिसी रद्द केली जाते. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पॉलिसाला लागणार पैसे असणं आवश्यक आहे. (saving account holder can invest rs 1 per month in pradhan mantri suraksha bima yojana)

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

 

Leave a Comment