नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील आता आपल्या ग्राहकांना 3-in-1 अकाउंट देत आहे. SBI 3-in-1 अकाउंटमध्ये, बँक सेव्हिंग अकाउंट, एक डिमॅट अकाउंट आणि ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंट एकाच वेळी लिंक केले जातात. या सुविधेसह आपल्या ग्राहकांना साधे आणि पेपरलेस ट्रेडिंग ऑफर करण्याचा SBI चा दावा आहे.
तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करायची असल्यास, तुमच्याकडे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. SBI ने ई-मार्जिन सुविधेसह SBI 3-in-1 अकाउंट उघडण्यास आणि एकाच छताखाली सेव्हिंग अकाउंट, एक डिमॅट अकाउंट आणि ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंट यांचा लाभ घेण्यास सांगितले आहे.
SBI savings bank account : कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत
PAN or Form 60
Photograph
खालील पैकी कोणतेही एक
Passport
Proof of possession of Aadhar
Driving License
Voter ID Card
Job Card issued by MNREGA
SBI Demat & trading account: Documents
passport size photograph (one)
Pan card copy
Aadhar card copy
One cancelled cheque leaf / Latest Bank statement.
SBI च्या मते, डिमॅट अकाउंट फिजिकल शेअर सर्टिफिकेटचे इलेक्ट्रॉनिक बॅलन्समध्ये रूपांतर करण्यास सक्षम करते. या व्यतिरिक्त, हे मार्केट / ऑफ-मार्केट ट्रेड्सच्या परिणामी इलेक्ट्रॉनिक बॅलन्स डिलिव्हरी / मिळवणे सुलभ करते.