हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑनलाईन व्यापार आणि देवाण घेवाण करायची आसेल तर, ग्राहकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण फसवणूक करणारे नवीन पद्धती अवलंबुन लोकांच्या खात्यातून पैसे चोरत आहेत. बँकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्याद्वारे असे म्हटले आहे की, फसवणूक करणारा कॉल करतो आणि म्हणतो की तो एक बँक अधिकारी आहे आणि तो केवायसी अद्ययावत करण्यास सांगतो. यासाठी ते एक अॅप डाउनलोड करायला सांगतात आणि आपला फोन ते रिमोट एक्सेसवर नेतात. यानंतर खातेधारकाच्या खात्यातून दुसर्या खात्यात पैसे जमा केले जातात.
काय आहे संपूर्ण प्रकरण
एसबीआयने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. फसवणूक करणारा ग्राहकाला कॉल करतो आणि म्हणतो की मी तुमच्या एसबीआयच्या गृह शाखेतून बोलत आहे. आपल्याला लवकरात लवकर केवायसी अद्यनवीत करावी लागेल. अन्यथा खाते बंद होईल. असे म्हटल्यावर ग्राहक ताणतणावात येतो आणि त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे द्यावी लागतील हे विचारतो. आधार कार्ड आणि पॅनकार्ड द्यावे लागेल, असे फसवणूक करणारे म्हणतात. यासाठी आपल्याला शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. ते आत्ताच बँकेतून आपले खाते अद्यनवीत करतील. यासाठी, ग्राहकाने एक क्विक व्हिव अँप डाउनलोड करावे. यानंतर, त्यांना फोनचा ऍक्सेस द्यावा लागेल. त्यानंतर खात्यातील रकमेसह फोनवरून बरीच वैयक्तिक माहिती चोरली जाते. या गोष्टी चुकूनही करू नका.
We urge our customers not to share their banking details or grant remote access to their phone or any other device from which the bank account is operated. Stay alert. Stay safe.#BankAccount #QuickViews #InternetBanking #CyberSafety https://t.co/Kf7MhzXwII
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 1, 2021
खात्यातून पैसे चोरी झाल्यास काय करावे?
एखाद्याच्या खात्यातून पैसे चोरी झाल्यास, तत्काळ हेल्पलाइन क्रमांकावर 155260 वर कॉल करा. वेळेवर बोलण्याने आपले पैसे वाचू शकतात. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत एकवीस लोकांचे तीन लाख तेरा हजार रुपये वाचवू शकलो आहोत. आपण ऑनलाइन फसवणूकीचे शिकार असाल तर, वेळ न गमावता लगेच हेल्पलाइन नंबर 155260 वर कळवा.