सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर संपूर्ण लॉकडॉऊन ः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर | सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे  जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना करीत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उद्या शनिवार 8 मेपासून रात्री आठ पासून 15 मेपर्यंत सकाळी 7 पर्यत मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व जिल्ह्यात आणखी निर्बंध लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संचारबंदी संदर्भात माहिती दिली. यावेळी जि.प. सीईओ दिलीप स्वामी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान भाजीपाला, किराणा दुकाने,  हॉटेल, बियर बार मॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला मार्केट, फळ मार्केट चित्रपटगृहे यासह विविध आस्थापने बंद असणार आहे. केवळ मेडिकल , रुग्णालय, दूध विक्री, कृषीचे दुकाने सुरू राहणार असेही शंभरकर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाचे नियम पाळावे, जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

You might also like