हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्राचा बँक भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना कमी वेळात चांगला परतावा मिळविण्याची संधी दिली आहे. SBI ने नुकतीच अमृत वृष्टि योजना सुरू केली असून , ही ठराविक कालावधीसाठीची फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे. जी 16 जुलै पासून सुरू झाली असून, या योजनेमध्ये ग्राहक 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे ग्राहकांना चांगला व्याजदर प्राप्त होणार आहे. म्हणजेच स्टेट बँकेने ग्राहकांना कमी वेळेत चांगला नफा मिळवून देण्याची संधी दिली आहे.
अमृत वृष्टि योजना
अमृत वृष्टि योजना हि एक टर्म डिपॉझिट योजना आहे, ज्याचा कालावधी 444 दिवस असतो . या योजनेमध्ये सामान्य ग्राहकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% वार्षिक व्याज दर मिळते . या योजनेचा लाभ देशी आणि विदेशी (NRI) ग्राहक दोन्ही घेऊ शकतात. त्यामुळे हि योजना ग्राहकांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्या टर्म डिपॉझिटसाठी लागू
SBI अमृत वृष्टि योजना ही 3 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या गृहस्थ रिटेल टर्म डिपॉझिटसाठी लागू आहे, ज्यात NRI रुपयांचे टर्म डिपॉझिटसुद्धा समाविष्ट आहेत. ही योजना नव्या डिपॉझिट्स तसेच पूर्वीच्या डिपॉझिट्सच्या नूतनीकरणावरही लागू होईल. टर्म डिपॉझिट आणि स्पेशल टर्म डिपॉझिटसाठी पे योजनाही लागू केली जाऊ शकते. तसेच रेकॉर्डिंग डिपॉझिट, टेक्स सेव्हिंग डिपॉझिट, एन्यूटी डिपॉझिट आणि मल्टी-ऑप्शन डिपॉझिटवर ही योजना लागू होणार नाही.
किती गुंतवणूक करावी लागेल ?
या योजनेमध्ये ग्राहक कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. तसेच जास्तीत जास्त गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही. ग्राहकांना यामध्ये महिन्याला , तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला व्याज दिले जाते. तसेच मिळालेल्या व्याजावर TDS कापला जातो. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास त्या रकमेवर कर्ज मिळू शकते. तुम्ही यामध्ये SBI शाखेच्या माध्यमातून , YONO SBI आणि YONO Lite मोबाईल अँपच्या माध्यमातून किंवा SBI इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने गुंतवणूक करू शकतात. तुम्ही 444 दिवसांचा कालावधी निवडल्यानंतर बँक आपोआप ही योजना लागू करेल.
वेळेआधी पैसे काढल्यास दंड
अमृत वृष्टि योजनेतून वेळेआधी पैसे काढल्यास दंड आकारला जातो. 25 लाखांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 0.50% दंड वसूल केला जातो. 5 लाखांपेक्षा अधिक आणि 3 कोटींपेक्षा कमी असलेल्या डिपॉझिट्सवर 1% दंड लागतो. जर डिपॉझिट काढण्यासाठी सात दिवसांपेक्षा कमी कालावधी असेल, तर त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. तसेच SBI स्टाफ आणि पेंशनधारकांना दंडामध्ये काही सवलत दिली जाते. त्यामुळे किमान ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवणे फायदेशीर ठरते, नाहीतर वेगाने पैसे काढल्यास दंडाचा सामना करावा लागतो.