SBI Bank Special FD Scheme | आपण आपल्या भविष्याचा विचार करून नेहमी कुठे ना कुठे आर्थिक गुंतवणूक करत असतो. याच गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशेष एफडी स्कीम अमृत कलेशमध्ये गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी अगदी कमी वेळ शिल्लक राहिला आहे. या एसबीआय बँकेच्या विशेष एफडीमध्ये (SBI Bank Special FD Scheme) तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे केवळ 31 मार्च 2024 पर्यंतचा वेळ आहे.
मिळणार एवढा व्याजदर
एसबीआय बँकेची ही खास अमृत कलश योजना आहे. (SBI Bank Special FD Scheme)या योजनेची खास गोष्ट म्हणजे ती एफडीवर 400 दिवसांसाठी 7.10 टक्के दराने व्याज देते. म्हणजेच या नवीन योजनेमध्ये ग्राहकांना अगदी कमी वेळेत जास्त व्याज मिळते. जर तुम्हाला देखील चांगली गुंतवणूक करायची असेल आणि त्यातून चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या एसबीआय बँकेच्या अमृत कलेश योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
जेष्ठ नागरिकांसाठी फायद्याची स्कीम | SBI Bank Special FD Scheme
एसबीआय बँकेच्या म्हणण्यानुसार बँकेच्या अमृत कलश स्पेशल एफडी या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना नागरिकांना 7.10% व्याजदर मिळेल त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर दिला जाईल. म्हणजे सामान्य नागरिकांपेक्षा जेष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत फायद्याची योजना आहे.
एसबीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कुणीही अमृत कलेश स्पेशल स्कीममध्ये (SBI Bank Special FD Scheme) 400 दिवसांसाठी ही एफडी तयार करू शकतो. त्याचा परतावा देखील खूप चांगला मिळतो.
या खास योजनेच्या मॅच्युरिटीवर टीडीएस कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होतात. अमृत कलश एफडीमध्ये (SBI Bank Special FD Scheme) जमा झालेले पैसे 400 दिवसाच्या कालावधीपूर्वी काढले गेल्यास बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50% ते एक टक्के व्याजदर वजा करू शकते. परंतु जेष्ठ नागरिकांसाठी त्याचप्रमाणे सागरी सामान्य नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक योजना आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.