Saturday, March 25, 2023

SBI कार्डधारकांना सणांमध्ये मिळणार 10 पट आनंद ! 3 ऑक्टोबरपासून ‘दमदार दस’ ऑफरमध्ये खरेदीवर उपलब्ध होणार कॅशबॅक

- Advertisement -

नवी दिल्ली । भारतातील सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कंपनी SBI कार्डने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी ‘दमदार दस’ कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल. SBI कार्डने सांगितले की,’तीन दिवसांच्या मेगाशॉपिंग फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. या ऑफर अंतर्गत, ग्राहक त्यांच्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. ही ऑफर ऑनलाईन व्यापारी EMI व्यवहारांवर देखील उपलब्ध असेल.’

ग्राहक सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने पेमेंट करू शकतील
SBI कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राममोहन राव अमारा म्हणाले, “आम्हाला डेटा विश्लेषणामध्ये असे आढळले की, कार्डधारक अधिक ऑनलाइन खरेदी करत आहेत. हा ट्रेंड सर्व प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट्स कॅटेगिरीमध्ये दिसून आला आहे, विशेषत: सणासुदीच्या काळात. या ऑफर अंतर्गत, कार्डधारक कोणत्याही वेळी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने पेमेंट करू शकतील.” ते म्हणाले की,”SBI कार्डने या ऑफरद्वारे कार्डधारकांना सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित पेमेंट सोल्यूशन्स (Payment Solution) देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हेतू आहे.”

- Advertisement -

काही कॅटेगिरीवर कॅशबॅक ऑफर लागू होणार नाही
फेस्टिव्ह ऑफर 2021 अधिक आकर्षक करण्यासाठी, SBI कार्ड ने अभिनेता जावेद जाफरी सोबत डिजिटल जाहिरात मोहीम सुरू केली आहे. हा कॅशबॅक मोबाईल फोन आणि एक्सेसरीज, टीव्ही आणि मोठी उपकरणे, लॅपटॉप आणि टॅब्लेट, होम फर्निशिंग, किचन उपकरणे, फॅशन आणि लाइफस्टाइल, स्पोर्ट आणि फिटनेस यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर इन्शुरन्स, ट्रॅव्हल, वॉलेट्स, ज्वेलरी, शिक्षण आणि यूटीलिटी मर्चंट्स यासारख्या काही कॅटेगिरीमधील ऑनलाइन खर्चावर लागू होणार नाही.