SBI ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस, होम लोनपासून पर्सनल लोनपर्यंत मिळणार मोठी सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रिटेल ग्राहकांसाठी रिटेल लोन आणि डिपॉझिट्सवर अनेक ऑफर्सचा पाऊस पाडला आहे. होम लोनवरील प्रोसेसिंग फी माफ केल्याच्या घोषणेनंतर बँकेने सर्व चॅनेल्सवरील कार लोन ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फीवर 100% माफी जाहीर केली आहे. ग्राहक त्यांच्या कार लोनच्या 90% पर्यंत ऑन-रोड फायनान्सिंगच्या सुविधा घेऊ शकतात. या व्यतिरिक्त, SBI इतर सवलतीच्या व्याज दरासह बाहेर आले.

कार लोन
SBI YONO द्वारे कार लोनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना 25 bps ची स्पेशल व्याज सवलत देण्यात आली आहे. SBI योनो युझर्स जे नवीन कार घरी आणण्याची योजना करत आहेत ते 7.5 टक्के दराने कमी व्याज दराने लोन घेऊ शकतात.

गोल्ड लोन
गोल्ड लोनच्या ग्राहकांसाठी, बँक व्याजदरात 75 bps कपात करत आहे. ग्राहक आता बँकेच्या सर्व चॅनेल्सद्वारे 7.5 टक्के दराने गोल्ड लोन घेऊ शकतात. बँकेने YONO द्वारे गोल्ड लोनसाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांचे प्रोसेसिंग फीसही माफ केले आहे.

पर्सनल लोन आणि पेन्शन लोन
पर्सनल लोन आणि पेन्शन लोनच्या ग्राहकांसाठी बँकेने सर्व चॅनेल्सवर प्रोसेसिंग फीस 100% माफ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने पर्सनल लोनसाठी अर्ज करणाऱ्या आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना 50 bps ची स्पेशल व्याज सवलत जाहीर केली आहे, जी लवकरच कार आणि गोल्ड लोनच्या अंतर्गत अर्जांसाठी देखील उपलब्ध होईल.

फिक्स्ड डिपॉझिट
रिटेल डिपॉझिटर्ससाठी, बँक स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्यावर ‘प्लॅटिनम फिक्स्ड डिपॉझिट’ सादर करत आहे. ग्राहक आता 15.08.2021 ते 14.09.2021 पर्यंत 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या मुदतीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर 15 bps पर्यंत अतिरिक्त व्याज घेऊ शकतात.

SBI ने काय सांगितले
SBI चे एमडी (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस सेट्टी म्हणाले, “सणासुदीच्या अगोदर आमच्या सर्व रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर्सची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही ऑफर ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक बचत करण्यास आणि त्याच वेळी त्यांच्या उत्सवावर उत्साह दुप्पट होण्यास मदत करेल.”

Leave a Comment