SBI FD Scheme | SBI ची जबरदस्त FD योजना; गुंतवणुकीसाठी ठरेल बेस्ट पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | SBI ही आपल्या देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असतात. आता देखील SBI ने एक नवीन ऑफर आणली आहे. बँक त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन योजना चालवत आहेत. या FD योजनेमध्ये (SBI FD Scheme) बँक ग्राहकांना 7.4% दराने व्याज देत आहे. हे व्याज पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिस स्कीम सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूप जास्त चांगले आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा कालावधी हा चांगला आहे. या योजनेमध्ये तुम्ही फक्त एक ते दोन वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. ही बँक सामान्य नागरिकांना 2 वर्षाच्या एफडीवर 7.4 टक्के दराने व्याज देते, तर हेच दोन वर्षासाठीच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांनाही बँक 7.90% दराने व्याज देते. ही

SBI च्या (SBI FD Scheme) खास योजनेमध्ये जर तुम्ही एक वर्षासाठी FD केली, तर सामान्य लोकांना 7.6% दराने व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60% दराने व्याज मिळेल. या योजनेत गुंतवणूकदारांना किमान 15 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 2 कोटी रुपये गुंतवणूक करता येते.

ज्या लोकांची निवृत्ती जवळ आलेली आहे, त्या लोकांसाठी ही एसबीआयची योजना सर्वोत्तम योजना आहे. ती म्हणजे सेवानिवृत्तीनंतर लोकांना जे PF मिळते. तो PF तुम्ही सहज गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेमध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली, तर त्यावर मिळणारे व्याज 0.05 टक्क्यांनी कमी होते. त्याचप्रमाणे या योजनेमधून तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा होतो.

या योजनेमध्ये तुम्ही 2 कोटी ते 5 कोटी रुपयांची एफडी केली तर ज्येष्ठ नागरिकांना एका वर्षात 7.77% आणि दोन वर्षासाठी 7.61 टक्के दराने व्याज मिळते. ही एक नॉनकॉलेबल स्कीम आहे. म्हणजेच तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी यातून पैसे काढू शकत नाही. तुम्ही जर मॅच्युरिटी पूर्वी या एफडीमधून पैसे काढले, तर त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.