नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या लाखो ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. एसबीआयने निवडक मॅच्युरिटी पीरिअडच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने एफडी (FDs interest rates) चे व्याज एक ते दोन वर्षांपर्यंत 10 बेसिस पॉईंटपर्यंत वाढविले आहे. हे नवीन दर 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. नवीनतम दर तपासून घ्या.
SBI ने सांगितले आहे की, 2 कोटींच्या खाली रिटेल एफडीवर 8 जानेवारीपासून हे दर लागू झाले आहेत. त्यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी व्याज दरात सुधारणा करण्यात आली होती.
नवीन FD चे दर तपासा
> 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीमध्ये 2.9 टक्के दराने व्याज मिळेल.
> 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.9 टक्के दराने व्याज दिले जाईल.
> 180 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडीसाठी 4.4 टक्के दराने व्याज दिले जाईल.
> 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडीला 4.4 टक्के दराने व्याज मिळेल.
> 1 वर्षापासून 2 वर्षाखालील एफडीला 5 टक्के व्याज मिळेल.
> 2 ते 3 वर्षांखालील एफडीला 5.1 टक्के दराने व्याज मिळेल.
> 3 ते 5 वर्षांच्या एफडीमध्ये 5.3 टक्के दराने व्याज मिळेल.
> 5 वर्ष आणि 10 वर्षाच्या एफडीला 5.4 टक्के दराने व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज दिले जाईल ?
ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळते. बँकेने केलेल्या दुरुस्तीनुसार ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते दहा वर्षे मुदतीच्या एफडीवर सुमारे 3.4 टक्के ते 6.2 टक्के व्याज मिळेल. चला तर मग दर तपासूयात…
> 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.4% दराने व्याज मिळेल
> 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4% दराने व्याज मिळेल
> 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9% दराने व्याज मिळेल
> 211 दिवसांपेक्षा 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.9% दराने व्याज मिळेल
> 1 ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.5% दराने व्याज मिळेल
> 2 ते 3 वर्षांखालील एफडीवर 5.6% दराने व्याज मिळेल
> 3 ते 5 वर्षांखालील एफडीवर 8.8% दराने व्याज मिळेल
> 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.2% दराने व्याज मिळेल
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.