हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली. यानंतर आता SBI नेही आपल्या ग्राहकांवरील कर्जाचा भार वाढवला आहे. बँकेने आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क आणि रेपो रेट लिंक्ड कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.
SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून एक्सटर्नल बेंचमार्क (EBLR) आणि रेपो रेट (RLLR) शी जोडलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या EMI वर होणार आहे. हे लक्षात घ्या कि, या महिन्याच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँकेकडून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. 15 ऑगस्टपासून SBI ने MCLR मध्ये 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे.
MCLR मध्ये वाढ केल्यानंतर आता एक वर्षावरील व्याजदर 7.70 टक्क्यांवर गेला आहे, जो याआधी 7.50 टक्के होता. त्याचप्रमाणे, दोन वर्षांचा MCLR 7.9 टक्के यात तीन वर्षांचा 8 टक्के झाला आहे. सध्या, बँकेची बहुतेक कर्जे ही एक वर्षाच्या MCLR दराशी जोडलेली आहेत.
RBI च्या सूचनांचे पालन करत बहुतेक बँकाकडून ऑक्टोबर 2019 पासून आपल्या कर्जाचे व्याजदर हे एक्सटर्नल बेंचमार्क किंवा रेपो व्याज दरांशी जोडले जात आहेत. यामुळेच RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरांवर होतो. यापूर्वी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ थेट ऑटो लोन आणि Home Loan शी जोडली जात आहे.
अशा प्रकारे असतील व्याजदर
SBI दर वाढीनंतर, एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जासाठीचे व्याज दर म्हणजेच EBLR 8.05 टक्के झाला आहे तर रेपो रेट RLLR शी जोडलेल्या कर्जाचा व्याजदर 7.65 टक्क्यांवर गेला आहे. बँक या वर क्रेडिट रिस्क प्रीमियम देखील आकारते. म्हणजेच, जर तुम्ही Home Loan किंवा ऑटो लोन घेत असाल तर या व्याजदरामध्ये क्रेडिट रिस्क प्रीमियम (CRP) देखील जोडला जाईल.
अशा प्रकारे जोडले जाते CRP
जवळपास सर्वच बँका ग्राहकांच्या CIBIL स्कोअरनुसार कर्जाच्या व्याजदरांमध्ये CRP जोडतात. जर एखाद्याचा CIBIL स्कोअर 800 च्या वर असेल, तर त्याच्यासाठी CRP जोडले जाणार नाही, मात्र जर CIBIL स्कोअर त्यापेक्षा कमी असेल, तर CRP 10 बेसिस पॉइंट्सवरून 60 बेसिस पॉइंट्सवर जोडला जाईल. या प्रकरणी आपला प्रभावी व्याजदर 8.65 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. Home Loan
EMI चा भार किती वाढेल ???
जर तुम्ही 30 लाखांचे Home Loan 7.8 टक्के व्याजाने 20 वर्षांसाठी घेतले असेल, तर सध्याचा EMI 24,721 रुपये असेल. अशाप्रकारे, संपूर्ण कालावधीसाठी 29,33,060 रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल. आता बँकेने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, त्यामुळे प्रभावी व्याजदर 8.30 टक्के झाला असेल. आता तुमचा EMI 25,656 रुपयांवर येईल. म्हणजेच तुमचा खर्च दर महिन्याला 935 रुपये आणि वर्षभरात 11,220 रुपयांनी वाढेल. हा व्याजदर पाहता, नवीन होम लोनवर संपूर्ण कालावधीसाठी 31,57,490 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/home-loans-interest-rates-current
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण !!!
Rakesh Jhunjhunwala यांना कोणत्या शेअर्समुळे नफा अन् नुकसान झाले ते पहा !!!
5 हजार रुपये ते 46 हजार कोटींचे मालक असा आहे Rakesh Jhunjhunwala यांचा शेअर बाजारातील प्रवास !!!
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!