हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून सर्वोत्तम फिक्स्ड डिपॉझिट स्कीम लाँच करण्यात आली आहे. नॉन-कॉलेबल डिपॉझिट स्कीम असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या एफडीवर ग्राहकांना 7.9% व्याज दिले जात आहे. चला तर मग आज आपण SBI या नवीन FD योजनेबाबतची माहिती जाणून घेउयात…
किती पैसे गुंतवावे लागतील ???
ही एक स्पेशल FD स्कीम आहे. यामध्ये ग्राहकांना किमान 15 लाख रूपये तर जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये बँकेकडून गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 1 वर्ष आणि 2 वर्ष असे दोन पर्याय दिले जातील. मात्र ग्राहकांना यामध्ये रिन्यूअलचा पर्याय दिला जात नाही. तसेच मॅच्युरिटीवर ही रक्कम ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
किती व्याज मिळेल ???
सध्याच्या काळात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बहुतेक बँका जास्तीत जास्त व्याज दर देत आहेत. ज्यामुळे SBI ने देखील ही खास योजना आणली आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, सर्वोत्तम योजनेअंतर्गत एका वर्षाच्या ईपीडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर सर्वसामान्यांना 7.1 टक्के व्याज दर मिळेल.
भरघोस नफा मिळवण्याची संधी
हे जाणून घ्या कि, SBI या योजनेमध्ये NSC, PPF आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज मिळत आहे. SBI सर्वोत्तम नावाच्या या योजनेमध्ये ग्राहकांना 2 वर्षांच्या FD वर सर्वसामान्यांना 7.4 टक्के ज्येष्ठ नागरिकांना 7.9 टक्के व्याज मिळत आहे. तसेच या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदरही दिला जात आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/sarvottam-domestic-term-deposit
हे पण वाचा :
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल
BSNL चा ‘हा’ प्लॅन खूपच फायदेशीर, पण रिचार्ज करावा की नाही ते जाणून घ्या
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना आता क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया