SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण फिक्स्ड डिपॉझिट्स करणार असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण सरकारी बँक असलेल्या SBI च्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट्स योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. SBI कडून सर्वोत्तम स्कीम अंतर्गत 15 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम जमा केल्यावर PPF, NSC आणि इतर पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स योजनांच्या तुलनेत जास्त व्याज दर दिले जात आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक दोन वर्षांच्या सर्वोत्तम डिपॉझिट्सवर 7.4% व्याज देत आहे. त्याच वेळी, SBI सर्वोत्तम (नॉन-कॉलेबल) टर्म डिपॉझिट योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षांच्या डिपॉझिट्सवर 7.9% व्याजदर मिळेल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना सर्वोत्तम योजनेंतर्गत 1 वर्षाच्या डिपॉझिट्सवर 7.6% आणि सर्वसामान्यांना 7.1% व्याज दर मिळेल.

SBI Announces Platinum Deposit Scheme, Offers 6.20% Interest Rate, Extra Benefits | Check Details Here

SBI च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार,17 फेब्रुवारी 2023 पासून सर्वोत्तम (नॉन-कॉलेबल) देशांतर्गत डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिटसाठीच्या व्याज दरात सुधारणा करण्यात आली आहे. इथे लक्षात घ्या कि, 15 लाखांपेक्षा जास्त 2 वर्षांच्या डिपॉझिट्सवर 8.14% वार्षिक रिटर्न मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 1-वर्षाच्या डिपॉझिट्सवर 7.6% रिटर्न देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे SBI 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 1 वर्षासाठी
7.55% तर 2 वर्षांसाठी 7.4% पर्यंत रिटर्न देत आहे.

SBI hikes interest rates on fixed deposits by up to 10 basis points | Business Standard News

SBI कडून नुकतेच रेग्युलर टर्म डिपॉझिट्ससाठीच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 2-3 वर्षे आणि 5 वर्षे ते 10 वर्षांच्या डिपॉझिट्सवर 7.5% व्याज दर दिले जात आहे. याशिवाय SBI 400 दिवसांच्या स्पेशल अमृत कलश डिपॉझिट अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6% तर सर्वनागरिकांना सामान्य 7.1% व्याजदर देत आहे. इथे हे लक्षात घ्या की, SBI सर्वोत्तम टर्म डिपॉझिट दरांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना विविध लहान बचत योजना आणि पोस्ट ऑफिस डिपॉझिटवर अत्यंत कमी व्याज दिले जात आहे. त्याविषयीची माहिती खाली देण्यात आली आहे.

Fixed Deposit Rates: SBI vs HDFC vs ICICI vs Axis Bank's latest FD interest rates | The Financial Express

पोस्ट ऑफिसमधील यॊजनांचे व्याज दर

5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7% व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस 1-वर्ष आणि 2-वर्षांच्या डिपॉझिट्सवर अनुक्रमे 6.6% आणि 6.8% व्याज मिळत आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम योजने अंतर्गत 7.1% व्याज दर मिळेल.

NSC वरील व्याज दर

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील डिपॉझिट्स सध्या वार्षिक 7% व्याज दर मिळत आहे. या योजनेमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करून कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळू शकेल.

KVP वरील व्याज दर

किसान विकास पत्र (KVP) मधील डिपॉझिट्सवर सध्या वार्षिक चक्रवाढ पद्धतीने 7.2% व्याज दर दिला जातो आहे. या योजनेद्वारे 120 महिन्यांत आपली गुंतवणूक दुप्पट होईल.

PPF वरील व्याज दर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ठेवींवर सध्या 7.1% व्याजदर दिला जातो आहे. तसेच एका वर्षात या खात्यामध्ये फक्त 1.5 लाख रुपयेच गुंतवता येतील. PPF वरील व्याज दर SBI च्या सर्वोत्तम डिपॉझिट्सपेक्षा कमी असला तरी PPF खात्यावर उपलब्ध असलेले फायदे कोणत्याही FD योजनेपेक्षा त्याला चांगले बनवतात.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits

हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
WhatsApp चे जबरदस्त फीचर, आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलू शकतील युझर्स
Vivo V27 : Vivo ने लाँच केले रंग बदलणारे 2 Mobile; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही
LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढली
adhaar Card Pan Card Link : आयकर विभागाने जारी केली महत्वाची सूचना, 31 मार्चपर्यंत लिंक करा अन्यथा…