SBI Special FD Schemes | स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही त्यांच्या गुंतवणूकदारांना नेहमीच नवनवीन योजना देत असते. जेणेकरून त्यांचे गुंतवणूकदार नेहमीच त्यांच्यासोबत व्यवहार करतील. आणि त्यांना देखील त्याचा चांगला फायदा मिळेल. तुम्हाला देखील आता एसबीआयच्यास एखाद्या विशेष स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे केवळ 31 मार्च 2024 पर्यंत वेळ आहे. सध्या एसबीआयच्या अमृत कलश योजना आणि SBI WeCare या दोन विशेष एफडी योजना आहेत. यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे केवळ 31 मार्च 2024 पर्यंत वेळ आहे. या दोन्ही योजनेमध्ये कमी वेळात तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू असतो. त्यामुळे तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
काय आहे SBI अमृत कलश योजना ? | SBI Special FD Schemes
एसबीआयची अमृत कलश योजना ही एक त्यांची विशेष एफडी योजना आहे. बँक या एफडीवर 7.10% दराने व्याज देते. ही 400 दिवसांची योजना आहे. त्यावर तुम्हाला 7.10% तुम्हाला व्याज मिळेल. म्हणजेच कमी कालावधीत तुम्हाला या एफडीमध्ये जास्त व्याजदर बँक देणार आहे. कोणीही अमृत कलश या विशेष योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यातून तुम्हाला खूप चांगला परतावा देखील मिळेल.
एसबीआयने 9SBI Special FD Schemes) दिलेल्या माहितीनुसार अमृत कलश योजना ही एफडी गुंतवणूक मासिक, त्रीमासिक आणि सहामाहीनुसार व्याज देऊ शकतात. या एफडी योजनेमध्ये तुम्ही जमा केलेले पैसे 400 दिवसांच्या आधीच काढले तर बँक दंड मधून लागू दरापेक्षा 0. 50 ते 1 टक्के व्याजदर कापू शकतात. तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही 31 मार्च आधीच या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
SBI Wecare एफडी योजना नक्की काय आहे?
एसबीआयने (SBI Special FD Schemes) वीकेअर एफडी योजना नवीन आलेली आहे. या योजनेमध्ये ग्राहकांना सगळ्यात चांगले व्याजदर मिळतो. या एफडीवर सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याज मिळते. त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना 7.5% दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये गुंतवणुकी तुम्ही किमान 5 वर्षे ते कमाल 10 वर्षासाठी करू शकता. या योजनेमध्ये देखील तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या योजनेमध्ये तुमची गुंतवणूक सुरू करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात जाऊन होणार आहे.