SBI Scheme | SBI ने ग्राहकांसाठी आणल्या खास योजना, 31 मार्चपर्यंतच घेता येणार लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SBI Scheme | आपले आर्थिक वर्ष मार्च ते एप्रिल यादरम्यान मोजले जाते. यावर्षीच्या आर्थिक वर्ष संपण्यास अधिक काहीच दिवस शिल्लक आहे. 31 मार्च 2024 हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे या महिन्याखेरपर्यंत पैशाच्या संबंधित जी काही कामे आहेत. ती करणे खूप महत्त्वाची आहेत. कर संदर्भात हा महिना खूप महत्त्वाचा असतो. या महिन्याच्या अखेरपर्यंत वर्षभराचा कर भरावा लागतो. यावेळी करमध्ये सूट मिळण्यासाठी किंवा कर वाचवण्यासाठी विविध योजनांचा करण्याचा विचार करत असतात.

तुम्ही देखील कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायच्या तयारीला लागले असेल, तर त्यासाठी 31 मार्च 2024 हि शेवटची तारीख आहे. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने काही योजनांचा विचार करून त्यांच्या ग्राहकांना काही फायद्याच्या योजना दिलेल्या आहेत. परंतु या योजनेची शेवटची तारीख ही 31 मार्चपर्यंत आहे त्यामुळे या तारखेच्या आधीच त्यांच्या बँकेच्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनांचा लाभ घेता येणार | SBI Scheme

एसबीआय अमृत कलश योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाची अत्यंत महत्त्वपूर्ण एफडी योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर 31 मार्च 2024 ची शेवटची तारीख आहे. आर्थिक दृष्टिकोनातून या योजनेचा फायदा खूप आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गुंतवणुकीवर 7.10% व्याज मिळते. यामध्ये 400 दिवसांच्या एफडीचा देखील समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याजाचा लाभ मिळतो.

WeCare एफडी योजना | SBI Scheme

एसबीआय बँकेच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल. तर 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला चांगले व्याजदर देखील मिळते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याज मिळते. या बँकेच्या योजनेचा व्याजदर हा 7.50% आहे. या योजनेचा कालावधी किमान 5 वर्षांनी कमाल 10 वर्ष एवढा आहे.

एसबीआय होम लोन व्याजदर

तुम्हाला जर होम लोन घ्यायचे असेल तर स्टेट बँकेकडून तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत घेऊ शकता. या बँकेच्या माध्यमातून होम लोनवर ऑफर देण्यात आलेला आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 ते 800 पेक्षा जास्त आहे. त्यांना 8.60% दराने होऊन दिले जाते. या गृह कर्जाचा व्याजदर 9.15 टक्के एवढा आहे.