RBI च्या नावाने होतोय मोठा स्कॅम; मिनिटातच होऊ शकते बँक अकाउंट रिकामे

RBI Fraud
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल ऑनलाईन फ्रॉड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून व्हॉइस मेसेज आला असेल, तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेक स्कॅमर्स आरबीआयच्या नावाने लोकांना व्हॉइस मेसेज पाठवत आहेत. यामध्ये त्यांची बँक खाती बंद करण्याचा धाक दाखवून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत सरकारने अलर्टही जारी केला आहे. सरकारने याला घोटाळा ठरवून अशा ध्वनी संदेशांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

व्हॉइस मेसेजद्वारे धमक्या दिल्या जातात

आरबीआयच्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या या बनावट व्हॉईस मेसेजमध्ये, “नमस्कार, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. तुमचे क्रेडिट कार्ड फसवणुकीत गुंतलेले आढळले आहे. येत्या २४ तासांत सर्व बँक खाती तुमच्या नावाने उघडले जाईल अधिक माहितीसाठी 9 दाबा.” जर एखाद्या व्यक्तीने भीतीपोटी 9 दाबले तर त्याची वैयक्तिक माहिती स्कॅमर्सच्या हाती जाण्याची भीती असते. त्यामुळे या व्हॉइस मेसेजमध्ये दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन करू नका.

असे व्हॉईस मेसेज घोटाळे कसे टाळायचे?

आजकाल, सायबर गुन्ह्यांची प्रकरणे खूप वाढली आहेत आणि घोटाळेबाज लोकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे घोटाळे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे-

  • जर कोणी बँक किंवा सरकारी अधिकाऱ्याची तोतयागिरी करत बोलत असेल, तर फोन नंबर आणि ओळखीची खात्री करा. कॉलर फसवणूक करणारा देखील असू शकतो.
  • फोनवर कोणाशीही संवेदनशील माहिती शेअर करू नका. सरकारी अधिकारी कधीही ओटीपीसह वैयक्तिक तपशील विचारत नाहीत.
  • जर कोणी तुम्हाला घाईत काहीतरी करण्यास सांगितले तर अशा सूचनांचे पालन करू नका. थोडा वेळ घ्या आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्हाला कोणत्याही संशयास्पद नंबरवरून कॉल आल्यास किंवा कोणत्याही गडबडीचा संशय असल्यास, अशा नंबरला त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा.