हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शाळेत सुरक्षित पोहचण्यासाठी आणि शाळेतून सुरक्षित घरी परत येण्यासाठी पालक मुलांना स्कूल बस (school bus) लावत असतात. पण याच स्कूल बस (school bus) कधीतरी घातकसुद्धा ठरतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एक मुलगी स्कूल बस (school bus) मधून उतरताना स्कूल बसच्या दारात अडकली. हि गोष्ट बस ड्रायव्हरच्या लक्षात न आल्याने ती बससकट 1 किलोमीटर फरफटत गेली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
HOLY SHIT.
The little girl is miraculously fine, the bus driver has been fired. pic.twitter.com/uuijsrNn2U— Dean Blundell🇨🇦 (@ItsDeanBlundell) September 23, 2022
काय आहे नेमके प्रकरण?
या दुर्घटनेतील पीडित लहान मुलगी स्कूलबसमधून (school bus) उतरताना दिसली तेव्हा तिची बॅग दरवाजात अडकली. बसचालकाला हे ती अडकलीय हे लक्षात आलं नाही. ती बसमधून (school bus) उतरल्याचे समजून त्याने बस वेगात चालू केली. चालक भरधाव वेगाने गाडी चालवत राहिला. मुलगी फरफटत राहिली. सुमारे 1 किलोमीटरपर्यंत हि मुलगी बसबरोबर फरफटत गेली.
यानंतर बराच पुढे गेल्यावर चालकाची नजर दरवाज्यात लटकलेल्या मुलीवर गेली. त्याने ताबडतोब गाडी थांबवली आणि गेट उघडून तो त्या मुलीकडे धावत गेला. या घटनेमुळे शाळेत सुरक्षित पोहचण्यासाठी आणि शाळेतून सुरक्षित घरी परत येण्यासाठी पालक मुलांना स्कूल बस (school bus) लावत असतात हे किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डीन ब्लंडेल या युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय