हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन School Holidays List । १५ जूनपासूनच राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच असून अर्ध्या वेळची शाळा सकाळी ९ ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे. आता महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण वर्षभरात किती दिवस शाळा बंद असणार आहेत ते या यादीतून समोर आलं आहे. शिक्षण विभागाच्या यादीनुसार यंदा तब्बल १२८ दिवस शाळांना सुट्टी राहणार आहे. यामध्ये सणवार, उन्हाळी सुट्ट्या आणि रविवारच्या सुट्ट्यांचा सुद्धा समावेश आहे.
राज्यातील शालेय कामकाजाचे दिवस 237 इतके असणार आहेत . यांमध्ये शाळेतील अध्ययन – अध्यापन कृती ( वर्गकार्य ) करीता 210 दिवस असणार आहेत. तर परीक्षा , मुल्यांकन व त्या अनुषंगिक कृती करीता 14 दिवस असणार आहेत . सह – शालेय उपक्रम – यांमध्ये दत्परविना 10 दिवस , आनंदायी शनिवार , शैक्षणिक सहल , शिबीर , सण – उत्सव इ करीता 13 दिवस देण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी रविवारच्या एकुण 52 सुट्टी आल्या आहेत , तर अन्य सार्वजनिक सुट्ट्या ह्या 76 दिवस असणार आहेत , असे एकुण यंदाच्या वर्षी 128 दिवस शाळेला सुट्टी असणार आहे . दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजेच (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) असणार आहे. उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्ट्या असणार आहे. २ मे ते १३ जून २०२६ पर्यंत उन्हाळी सुट्टी निमित्त शाळा बंद असणार आहेत. School Holidays List
पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी – School Holidays List
जुलै : आषाढी एकदशी, मोहरम, नागपंचमी
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी




