नवी दिल्ली । आग आणि पाणी यांचे स्वरूप एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहे. अशा परिस्थितीत जर पाण्याने आग लावली तर त्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीणच होईल. आणि जर ही आग देखील समुद्रात लागली असेल तर ते पाहून आश्चर्यचकित होणे साहजिकच आहे. मेक्सिकोच्या युकाटान द्वीपकल्पात (Mexico’s Yucatan Peninsula) समुद्राच्या आत आगीचा गोळा दिसून आला. ज्यांनी हे दृष्य पाहिले त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
शुक्रवारी मेक्सिकोच्या युकाटनमध्ये पिघळलेला लावा समुद्राच्या वर तरंगताना दिसला. हे दृश्य इतके धक्कादायक होते की, त्याचे फुटेज सोशल मीडियावर टाकताच ते झटक्यात व्हायरल झाले. निळ्या समुद्राच्या मधोमध नारंगी रंगाची ज्योत दूरपर्यंत पसरलेली दिसणे हे फार विचित्र दिसत आहे. वास्तविक ही आग समुद्राच्या मध्यभागी पाण्यातील पाइपलाइनमधून गॅस गळती झाल्यामुळे लागली.
🚨 Sobre el incendio registrado en aguas del Golfo de México, en la Sonda de Campeche, a unos metros de la plataforma Ku-Charly (dentro del Activo Integral de Producción Ku Maloob Zaap)
Tres barcos han apoyado para sofocar las llamas pic.twitter.com/thIOl8PLQo
— Manuel Lopez San Martin (@MLopezSanMartin) July 2, 2021
पाण्यात वाहणारा लावा
हे दृष्य पाहून असे दिसते की, समुद्रामध्ये वाहणारा लावा दिसून आला. हे दृश्य शुक्रवारी सकाळीच युकाटन द्वीपकल्पात पाहिले गेले. मेक्सिकोची सरकारी पेट्रोलियम कंपनी पेमेक्सच्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाली, त्यानंतर येथे भीषण आग लागली. पहाटे 5: 15 वाजता गॅस गळतीस सुरुवात झाली आणि 12 इंच व्यासाच्या पाईपलाईनला आग लागली. मेक्सिकोमध्ये 5 वर्षांपूर्वीही अशी घटना घडली आहे, त्यावर नियंत्रण ठेवले गेले आणि त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
🚨 Incendio registrado en aguas del Golfo de México
A 400 metros de la plataforma Ku-Charly (dentro del Activo Integral de Producción Ku Maloob Zaap)
Una válvula de una línea submarina habría reventado y provocado el incendio
Esta fuera de control hace 8 horas pic.twitter.com/KceOTDU1kX
— Manuel Lopez San Martin (@MLopezSanMartin) July 2, 2021
खरे कारण माहित नाही
पेमेक्स कंपनीच्या वतीने असे सांगितले गेले की, या घटनेचे खरे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तथापि, या अपघातावर त्वरित कारवाई करण्यात आली आणि अग्निशमन दलाने कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही. मेक्सिकोच्या ऑईल सिक्योरिटी रेग्युलेटर एंजल कॅरिझालेस यांनी घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या घटनेनंतर तेल गळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे, परंतु समुद्राच्या पृष्ठभागावर आग का वाढत आहेत हे सांगण्यात आले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील लोकं इतके उत्सुक झाले आहेत की, ते म्हणतात की, हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या एखाद्या सीनसारखे दिसत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group