हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच भांडवली बाजार नियमक संस्था सेबी यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सेबीने म्युच्युअल फंड मार्केटिंग संदर्भात हा एक निर्णय घेतलेला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅक रॉक यांना म्युच्युअल फंडात येण्यामध्ये त्यांची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील जिओ फायनान्शिअल सर्विसेसच्या म्युच्युअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे.
जिओ फायनान्शियलने एक्सचेंज फाईलमध्ये याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅक रॉक फायनान्शियल मॅनेजमेंट सोबतच्या संयुक्त वेंचरला म्युच्युअल फंडात प्रवेश करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जिओ आणि ब्लॅक रॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व कागदपत्रे सेबीकडे दिल्यानंतर त्यांच्या वेंचरला मंजुरी दिलेली आहे. या कंपन्यांनी 2023 मध्ये एकमेकांशी करार केला होता. आणि आता एक वर्षानंतर हा करार मंजूर झालेला आहे. म्युच्युअल फंड मार्केटमध्ये प्रवेश मिळण्यासाठी या कंपन्यांनी संयुक्तपणे 2023 ऑक्टोबर मध्ये यासाठी सेबीकडे अर्ज केलेला होता. या नव्या नवीन प्रकल्पासाठी या दोन्ही कंपन्या आता 15 – 15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.
यावेळी ब्लॅक-अप कंपनीच्या रिचल लॉर्ड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की, “सेबीने दिलेल्या या निर्णयामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे. आम्ही भारतातील कोट्यावधी लोकांना स्वस्त आणि चांगला गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिओ फायनान्शिअल सर्विस या कंपनीसोबत पार्टनरशिप करून आम्ही भारताला गुंतवणूक आणि बचत करणाऱ्या देशासाठी बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी वित्तीय सेवा देत असतात. या अगोदरही कंपनी रिलायन्स उद्योग समूहाचे उप कंपनी होती. जिओ फायनान्शिअल सर्विसेस या कंपनीची उप कंपनीची व फायनान्स या कंपनीकडे एनबीएससीचा परवाना आहे. याच कंपनीची जिओ पेमेंट्स बँक ही आणखी एक उप कंपनी आहे.