भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला आणि…;

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. बऱ्याचवेळा आपण केलेल्या चुका आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला भरधाव ट्रेन (Railway) समोरून येत असतानासुद्धा रेल्वे (Railway) ट्रॅक पार करते. या महिलेने एकदा नव्हे तर दोन वेळा रेल्वे (Railway) ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा कसाबसा तिचा जीव वाचला तरी दुसऱ्यांदा तिने पुन्हा रिस्क घेतली. सुदैवाने यामध्ये या महिलेचा थोडक्यात जीव वाचला आहे.

रेल्वे (Railway) ट्रॅक क्रॉस करू नये, असं वारंवार सांगितलं जाते मात्र असे असतानादेखील काही लोक त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचे धाडस करतात. वेळ वाचवण्यासाठी किंवा काही पैसे वाचवण्यासाठी अनमोल असा जीव धोक्यात टाकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात काही लोकांनी आपला वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, ट्रेन (Railway) मध्येच थांबली आहे. त्यावेळी तिथं जवळच राहणारे लोक त्या ट्रेनमधून उतरले आणि ट्रॅक क्रॉस करू लागले. बरेच लोक आहेत, त्यांचं सामान त्यांच्यासोबत आहेत. ट्रेनमधीलच एका व्यक्तीने या सर्वांचा व्हिडीओ शूट केला. तेव्हा त्यामध्ये हि भयानक घटना कैद झाली आहे. जेव्हा हे लोक रेल्वे ट्रॅक क्रॉस करायला गेले तेव्हाच समोरून भरधाव ट्रेन येत होती. एका व्यक्ती या व्हिडीओत ट्रेन येत असल्याचं त्यांना सांगताना दिसत आहे. मात्र तरीदेखील हे लोक सामान घेऊन ट्रॅकवरून जातात. सुदैवाने सर्वजण ट्रेन (Railway) यायच्या आधी पलीकडे पोहोचतात. पण एक महिला मात्र ट्रॅकवरच असते. ट्रकवरच उभं राहून ती सामान दुसऱ्या बाजूला फेकते आणि स्वतः पुन्हा मागे येते. यावेळी ट्रेन या महिलेपासून काही अंतरावर असते. मात्र ती ट्रेन या महिलेला धडकायच्या आधी हि महिला पटरीच्या पलीकडे येते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment