Secret Beach | मुंबई हे स्वप्नांची नगरी आहे. अनेकजण स्वतःच्या उराशी कितीतरी स्वप्न बाळगून मुंबईमध्ये जातात. मुंबई हे कसे शहर आहे जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते. अगदी 24 तास गर्दी एका बाजूला, तर एका बाजूला नजर पोहोचणार नाही, इथपर्यंत अथांग पसरलेला समुद्र.. वरवर जरी सुंदर आणि अगदी शांत दिसत असला, तरी मानवाच्या मनाप्रमाणेच या समुद्राच्या तळाशी देखील अनेक हालचाली चाललेल्या असतात. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन अगदी धकाधकीचे असते. त्यामुळेच या सगळ्यातून वेळ काढून मुंबईतील लोक इतरत्र शांततेसाठी जातात. मुंबईला लाभलेले एक सगळ्यात मोठे वरदान म्हणजे समुद्र. अगदी मुंबईच्या चौफेर अथांग समुद्र पसरलेला आहे. या समुद्रावर जाऊनच अनेक लोकांचे मन हलके होत असते.
आपल्याला मुंबईतील अनेक चौपाटी, बीचची (Secret Beach) माहिती आहेत. ज्यांना वेळोवेळी सगळेच भेट देत असतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध देखील आहे. परंतु नवी मुंबईत एक सिक्रेट समुद्र मिळालेला आहे. जो सिक्रेट समुद्रकिनारा कोणत्याही व्यक्तीला मोहन टाकेल अगदी असाच आहे. हा समुद्र अतिशय सुंदर आहे. इथे पर्यटकांची जास्त गर्दी देखील नसते. मुंबईपासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. ज्याबद्दल अनेकांना माहिती देखील नाही. तुम्हाला जर अत्यंत शांततेचा आणि समाधानाचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही या सीक्रेट समुद्रकिनाऱ्याला नक्कीच भेट देऊ शकता.
हा सिक्रेट समुद्रकिनारा (Secret Beach) उरणपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर या ठिकाणी रेल्वेने गेला तर तुम्हाला बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून रिक्षाने या समुद्रावर जाता येईल. या ठिकाणी माणसांची जास्त गर्दी देखील नसते. त्यामुळे तुम्हाला तुमचा आनंद घेता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा जास्त प्रमाणात घाण नाही. कारण या ठिकाणी जास्त लोक नसतात. त्यामुळे तुम्हाला अत्यंत स्वच्छ असा समुद्रकिनारा अनुभवायला मिळेल. त्यासोबतच या समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक मंदिरे तसेच दर्गा देखील आहेत. म्हणजेच या ठिकाणी गेल्यावर देवदर्शन देखील होईल.
मुंबईतील या सिक्रेट समुद्रकिनाऱ्याचे नाव पिरवाडी बीच असे आहे. हा पिरवाडी बीच सनसेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही अत्यंत सुंदर असा सनसेट पाहू शकता. त्याचप्रमाणे समुद्रावर असलेली रेती वाळू आणि सोनेरी लाटा यामुळे तुमचे मन नक्कीच मोहन जाईल. या समुद्रकिनाऱ्याच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर या ठिकाणी अनेक झाडे आहेत. या ठिकाणी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे आहेत. तसेच येथे तुम्हाला पांढरी रेती देखील बघायला मिळेल. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्य अजूनच फुलून आलेले आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये जे पर्यटक राहतात. त्यांच्यासाठी हा समुद्रकिनारा खूपच जवळ आहे. आणि विकेंडला ते नक्कीच या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकतात.