Google Chrome चे नवीन फिचर पहा, आता अवघड कामही होणार सोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।Google Chrome ने आपल्या नवीन अपडेटमध्ये काही नवीन फीचर्स जोडली आहेत. एक फीचर कॉस्मेटिक इफेक्टसाठी आहे आणि दोन फीचर हे रूटीन कामे सुलभ करण्यासाठी दिली आहेत. जरी हे फीचर्स हळूहळू रोल आउट केले जात असले तरी, काही युझर्स आधीच त्यांचा वापर करण्यास सक्षम होते, मात्र आता ही फीचर्स प्रत्येकासाठी आणली गेली आहेत. ही फीचर्स Google Chrome चे नवीन व्हर्जन 96.0.4664.45 मध्ये पाहिले जाऊ शकतात. Google Chrome हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे वेब-ब्राउझर आहे.

हायलाइटसाठी लिंक कॉपी करा
जर तुम्हाला वेबपेजवर मजकूराचा विशिष्ट भाग शेअर करायचा असेल, तर तुम्ही ‘Copy link to highlight’ हा ऑप्शन वापरू शकता. अशा प्रकारे शेअर केलेली लिंक ओपन केल्याने तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला पेजच्या त्याच भागात घेऊन जाईल जो तुम्हाला शेअर करायचा होता. ते वापरण्यासाठी, तुम्हाला जो मजकूर शेअर करायचा आहे तो पहिल्यान्दा हायलाइट करावा लागेल, त्यानंतर राईट -क्लिक करा आणि हायलाइट आणि शेअर करण्यासाठी कॉपी लिंकचा ऑप्शन निवडा.

Google Chrome: सर्च टॅब
अनेकदा आपण Google Chrome मध्ये एकाच वेळी अनेक टॅब उघडतो. ऑफिस वगैरे काम करणाऱ्या लोकांना अनेक टॅब उघडावे लागतात. अशा परिस्थितीत कोणताही एक टॅब शोधणे कठीण होते. हे काम सोपे करण्यासाठी Google Chrome ने सर्च टॅब फीचर दिले आहे. तुम्हाला Chrome विंडोच्या वरच्या जागी एक ड्रॉप-डाउन बटण दिसेल. ते दाबल्यानंतर, तुम्हाला लिस्ट मधील सर्व टॅब दिसतील आणि येथे तुम्ही टॅब देखील शोधू शकता. त्याचा कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + Shift + A आहे.

बॅकग्राऊंडचा रंग बदला
काही युझर्ससाठी, Google Chrome मध्ये बॅकग्राऊंड आणि रंग बदलण्याचा ऑप्शन आधीपासूनच अस्तित्वात आहे, मात्र आता तो सर्वांसाठी लाईव्ह झाला आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त Chrome प्रोफाइल वापरत असल्यास, तुम्ही प्रत्येक प्रोफाइलसाठी वेगळी थीम निवडू शकता. ते वापरण्यासाठी, तुम्हाला Chrome मध्ये एक नवीन टॅब उघडावा लागेल आणि नंतर खाली दिलेल्या Customize Chrome ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही येथे असलेला बॅकग्राऊंड निवडू शकता किंवा तुम्ही नोएमल देखील बॅकग्राऊंड निवडू शकता.