आता पॅकेट पाहिल्यावर समजेल तुमचे खाद्य किती Healthy आहे, सरकारने केली मोठी तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पॅकेज्ड फूडच्या दर्जाबाबत सर्वसामान्यांनाच नव्हे, तर सरकारलाही चिंता आहे. यावर उपाय म्हणून पॅकेजिंग केलेल्या वस्तूंसाठी हेल्थ स्टार रेटिंग लवकरच सुरू केली जाणार आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) सर्व पॅकेज केलेल्या उत्पादनांची हेल्थ रेटिंग करेल, जेणेकरुन ग्राहकाला त्याचे खरेदी केलेले उत्पादन आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे समजू शकेल. एका उच्च FSSAI अधिकाऱ्याने सांगितले की,” हेल्थ स्टार रेटिंग (HSR) चे उद्दिष्ट ग्राहकांना निरोगी खाण्याकडे आणणे आहे, जेणेकरून भारतीयांना खराब जीवनशैलीमुळे आजारी पडण्यापासून वाचवता येईल.”

‘या’ पॅरामीटर्सवर रेटिंग ठरवले जाईल
FSSAI च्या अधिकाऱ्याने सांगितले की,”उत्पादनांचे हेल्थ रेटिंग त्यात असलेले मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणाच्या आधारावर ठरवले जाईल. त्याची माहिती पॅकेटच्या पहिल्या पानावर दिली जाईल.” ही तयारी IIM अहमदाबादच्या रिसर्च रिपोर्टनंतर केली जात आहे, ज्यामध्ये पॅकेटच्या पहिल्या पानावर माहिती दिल्यास ग्राहकांवर अधिक परिणाम होईल, असे सांगण्यात आले आहे.

20 हजार लोकांवर सर्वेक्षण करण्यात आले
FSSAI चे सीईओ अरुण सिंघल यांनी सांगितले की,”IIM अहमदाबादने देशभरातील सुमारे 20 हजार लोकांचे सर्वेक्षण केले आणि समाजाला निरोगी खाण्याकडे कसे वळवले जाऊ शकते हे शोधून काढले. या बदलाद्वारे मधुमेह, बीपी इत्यादी असंसर्गजन्य आजारांना (एनसीडी) प्रतिबंध केला जाईल.”

पॅकेटवर माहिती अजूनही मागे आहे
FSSAI ने उत्पादनांमध्ये उपस्थित असलेल्या पोषक तत्वांची माहिती देण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत, मात्र तरीही कंपन्या ते पॅकेटच्या मागील बाजूस देतात. IIM अहमदाबाद (IIM-A) ने सुचवले की, पहिल्या पानावर माहिती दिल्यास जास्त प्रभाव दिसून येईल. हे मानक ब्रिटन, चिली, मेक्सिको, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये पाळले जाते.