सीमा हैदरचे राष्ट्रपतींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही व्हिसा शिवाय फक्त आपला प्रियकर सचिन साठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या सीमा हैदरची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. सीमा फक्त प्रेमासाठी भारतात आली कि यामागे कोणता मोठा हेतू आहे असा संशय सुद्धा आला. तिची ATS कडून सखोल चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. यानंतर आता सीमा हैदरने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकिल ए.पी.सिंग यांनी सीमा हैदरच्या वतीने हे पत्र लिहिले असून आपल्यावर दया करावी आणि सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती या पत्रातून कऱण्यात आली आहे.

ए.पी.सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे कि, माननीय मॅडम, माझ्या याचिकाकर्त्याला (सीमा हैदरला) भारतात सचिन मीना यांच्यासोबत प्रेमळ पती, वडिलांच्या समान सासरे आणि आईच्या रूपात प्रेमळ सासू मिळाली आहे. भारतात सीमाला इतकं प्रेम, शांती आणि आनंद मिळाला जो यापूर्वी तिला कधीच मिळाला नव्हता. त्यामुळे सीमा हैदर तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा आणि दया दाखवा. तुम्ही दया दाखवली तर सीमांचे उर्वरित आयुष्य पती, तिचे चार लहान मुले आणि सासरच्या लोकांसोबत व्यतीत होईल. तुम्ही तिला संधी दिलीत आणि तुम्ही तिला ताकद आणि आधार देऊ शकला तर सीमा कायमच तुमच्याप्रती कृतज्ञ असेल.

कशी झाली सीमा- सचिनची ओळख ?

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी असलेली सीमा 2019-20 मध्ये PUBG हि ऑनलाइन गेम ऑनलाइन गेम खेळताना ती सचिनच्या संपर्कात आली. त्यानंतर दोघानींनी आधी इंस्टाग्राम आणि मग व्हॉट्सअॅप वर चॅटिंग सुरू केले. त्यानंतर सीमा 13 मे रोजी नेपाळमार्गे बसमधून तिच्या चार मुलांसह भारतात दाखल झाली. ग्रेटर नोएडातील रबुपुरा भागात राहणाऱ्या सीमा सचिनसोबत राहू लागली. बेकायदेशीर पद्धतीने सीमा भारतात राहिल्याने तिच्यासह सचिनलाही अटक करण्यात आली. मात्र, दोघांनाही स्थानिक न्यायालयाने ७ जुलै रोजी जामीन मंजूर केला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सीमा आणि सचिनची दोन दिवस सखोल चौकशी केली. मात्र काहीही झालं तरी आपण परत पाकिस्तानला जाणार नाही असे सीमाने सांगितलं आहे. तिला सचिनसोबत भारतातच राहायचे असून आपण हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावाही सीमाने केला आहे. आता थेट तिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले असून त्यावर त्या काय उत्तर देतात हे आता पाहावं लागेल.