रोहन भाटे यांची BNHS पदावर निवड : खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष व सातारा जिल्हा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) गव्हर्निंग कौन्सिलपदावर २०२२ ते २०२६ या कालावधीसाठी निवड झाली. पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच ह्या पदावर निवडून आल्याने खा. श्रीनिवास पाटील यांनी रोहन भाटे यांचा सत्कार केला.

पर्यावरण संवर्धनासह जैवविविधता संशोधन व संवर्धनासाठी १९८३ पासून ही संस्था कार्यरत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची १५ सप्टेंबर १९८३ रोजी स्थापना झाली. भारतातील संवर्धन आणि जैवविविधता संशोधनातील संस्था आहे. विज्ञान आधारित संशोधन, संवर्धन समर्थन, शिक्षण, वैज्ञानिक प्रकाशने, निसर्ग सहलीसह अन्य कार्यक्रमांद्वारे निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम संस्था करते. भाटे या संस्थेचे आजीवन सदस्य आहेत. पश्चिम घाटातील पक्षीविज्ञान आणि सरपटणारे प्राणी आदींचा ते अभ्यास करत आहेत.

श्री. भाटे वन विभागाला मदत करतात. मानद वन्यजीव रक्षक म्हणून त्यांची नेमणूक आहे. शासनाच्या भारतीय पँगोलिन समिती, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो या ठिकाणी त्यांची नियुक्ती आहे. वन गुन्हे नियंत्रणात ठेवण्यात त्यांचा हातभार असतो. वन्यजीव कृती आराखडा समितीवरही ते सल्लागार आहेत. BNHS ही 138 वर्षे निसर्गाच्या रक्षणासाठी व संवर्धन साठी संशोधन करते. या संस्थेच्या संचालक पदी चुरशीच्या निवडणूक होऊन भाटे यांची निवड झाली आहे.

Leave a Comment