अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
दिवसेंदिवस महिला अत्याचारच्या घटना वाढत आहेत.अनेकवेळा एकटेपणाचा फायदा घेऊन मुलींवर अतिप्रसंग येतात. अशा परिस्थितीत मुलींना बाल वयातच स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मिरॅकल हार्ट फाउंडेशन अमरावतीच्यावतीने. मुलींच्या संरक्षणासाठी एक चर्चा सत्र आणि सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
छेडछाड,स्त्री अत्याचार, बलात्कार, अनेकदा मान्यवर मार्गदर्शन करतात परंतु ज्यावेळी मुलींसोबत वाईट प्रसंग घडतात तेव्हा मुलींनी आपले आत्मसंरक्षण कसे करावे हे माहीत नसते म्हणूनच विद्यार्थिनींना बालवयातच आत्मसंरक्षणाचे धडे दिल्यास कठीण प्रसंगी आपला बचाव मुली करू शकतील यादृष्टीनं या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं हो. यावेळी आपल्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कसे पळून लावावे. त्याच्याशी कसा सामना करावा याचे धडे यावेळी विद्यार्थिनींना देण्यात आले.