हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. याद्वारे अनेक लहान लहान गोष्टी अगदी सहजपणे शेअर करता येतात. तसेच याद्वारे लोकांना हवे तेव्हा लोकेशन, फोटो, कॉन्टॅक्ट सारख्या गोष्टी एकमेकांना पाठवता येतात. तसे पहिले तर व्हॉट्सअॅपवर एका क्लिक मध्ये सर्व कामे सहजपणे केली जातात. मात्र अशाच प्रकारे जर आपल्याला टाईप न करता मेसेज पाठवता आला तर ???
होय, आता Android फोनवर व्हॉइस रेकग्निशनसह असे करता येईल. आता अँड्रॉइड फोनवरून गुगल असिस्टंटद्वारे फक्त बोलून आपल्याला कोणालाही मेसेज पाठवता येतील. चला तर मग आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये टाइप न करता मेसेज कसा पाठवता येईल ते जाणून घेऊयात …
यासाठी सर्वात आधी फोनवर गुगल असिस्टंट ओपन करा. त्यानंतर वरच्या बाजूच्या उजव्या कोपर्यात असलेल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
पॉपुलर सेटिंग्ज टॅबवर जाऊन खाली स्क्रोल करा आणि Personal Result पर्याय चालू करा. आता ‘OK Google’ किंवा ‘Hey Google’ बोलून व्हॉइस असिस्टंट ऍक्टिव्हेट करा.
त्यानंतर ‘Send a WhatsApp message to (तुम्ही ज्याला पाठवू इच्छिता त्याचे नाव)’ असे म्हणा. यानंतर कदाचित Google तुम्हाला विचारेल की तुम्हाला टेक्स्ट किंवा WhatsApp यापैकी कोणत्या मोडमध्ये मेसेज पाठवायचा आहे. आता WhatsApp म्हणावे लागेल.
आता तुम्हाला जो मेसेज पाठवायचा आहे ते सांगा. अशा प्रकारे काहीही टाइप न करता Google आपला मेसेज पाठवेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/
हे पण वाचा :
Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या
PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!
LPG price : सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये वाढ झाल्याने कमर्शिअल LPG कनेक्शन महागले !!!
Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा