हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Senior Citizen FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये कमी जोखीम देखील आहे. त्याच प्रमाणे त्यावर खात्रीशीर रिटर्न देखील मिळते. निवृत्ती नंतर निश्चित उत्पन्न हवे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक FD मध्येच गुंतवणुकीस प्राधान्य देतात. त्याच प्रमाणे जवळपास सर्वच बँकाकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर इतरांपेक्षा जास्त व्याज मिळते.
हे जाणून घ्या कि, RBI कडून सध्याच्या काळात वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ केली जाते आहे. ज्यामुळे बँकांकडून कर्जावरील व्याजदर वाढवले जात आहेत, मात्र त्याचबरोबर FD वरील व्याजदरही वाढत आहेत. आता तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांदेखील 5 वर्षांच्या कालावधीवर 7.00% पर्यंत वार्षिक रिटर्न देत आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
कॅनरा बँकेच्या FD वरील व्याजदर
कॅनरा बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 आणि 3 वर्षांच्या FD वर 7.00% याशिवाय एक वर्षाच्या कालावधीसाठी 7.25% दराने व्याज दिले जात आहे. Senior Citizen FD Rates
इंडियन बँकेच्या FD वरील व्याजदर
या सरकारी बँकेकडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.00% तर 3 वर्षांसाठी 6.75% याशिवाय 1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.60 टक्के व्याज दिले जात आहे. Senior Citizen FD Rates
बँक ऑफ इंडियाच्या FD वरील व्याजदर
या सरकारी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या FD वर वार्षिक 6.75 टक्के दराने तर 3 वर्षांसाठी 7.25% आणि 1 वर्षासाठी 6.50% व्याज दिले जात आहे. Senior Citizen FD Rates
बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD वरील व्याजदर
बँक ऑफ महाराष्ट्र 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6.25% तसेच 3 वर्षांच्या कालावधीसाठी 6.50% आणि 1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.65% व्याज देत आहे. Senior Citizen FD Rates
बँक ऑफ बडोदाच्या FD वरील व्याजदर
या सरकारी बँकेकडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.90 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच 3 वर्षांसाठी 7.25 टक्के तर 1 वर्षाच्या कालावधीसाठी 7.25% व्याज दिले जाईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/deposits-interest-rates
हे पण वाचा :
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या पैशांत केली 6 पट वाढ
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
Online Banking : चुकीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या