सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथील घटना अनोळखी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सदरील मृतदेह हा पुरूष कि महिला यांची ओळख पटलेली नसल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले आहे.
सातारा शहराच्या हद्दीतील मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. पहाटे घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
शहराच्या हद्दीवर घडलेल्या घटनेमुळे लोकांच्यातून तर्कविर्तक लढविले जात आहेत. परंतु पोलिसांकडून या मृतदेहाविषयी काहीही ठोस माहीती अजूनही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळाची कसून तपासणी करण्याचे काम सध्या खंडोबाचा माळ परिसरात चालू आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा