हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन होता असं म्हणत शिंदेनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच भाजपच्या काही आमदारांना फोडण्याचा सुद्धा कट होता असेही एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकले. उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते आणि महाविकास आघाडीची स्थापना ही पूर्वनियोजित होती असाही गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.
एकनाथ शिंद म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government) मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ ठाकरे कुटुंबाकडून सतत अपमान आणि 100% हस्तक्षेप अधोरेखित करतो. मी नगरविकास मंत्री असतानाही मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही, कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) ढवळाढवळ होता.अनेक प्रसंगी मला ते नागरी विकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठका बोलावताना आढळले. एवढच नव्हे तर माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता, नक्षलवाद्यांकडून धमकी येऊनही मला ठाकरेंनी Z+ सुरक्षा दिली नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याची गोष्ट शिंदेनी फेटाळून लावली. ते म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार होते तेव्हा मला मुख्यमंत्री बनवलं जाईल या अपेक्षेने मला जास्तीचे पोलिस प्रोटेक्शन मिळालं होते, परंतु नंतर मला सांगण्यात आलं पवारांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले. मात्र, ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी शिवसेनेने आपल्याकडे लोक पाठवले होते, असे पवारांनी मला स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही अडचण नाही. आपण राज्यात १६ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आणि महायुती मागच्या वेळच्या ४२ जागांचा रेकॉर्ड तोंडेल आणि आणखी जास्त जागा जिंकेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच भाजपच्या ‘सर्व्हे’मुळे हेमंत पाटील आणि भावना गवळी याना तिकीट नाकारल्याचे सुद्धा त्यांनी फेटाळल. “उमेदवार बदलणे हा अंतर्गत मामला होता. भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शिंदेनी स्पष्ट केलं.