सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू; रोहित्रावरील तार तुटल्याने घडली घटना

0
79
SHOCK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | रोहित्रावरील विद्युत तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सात गाईंचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. शहरापासून काही अंतरावर असलेल्या गेवराई ब्रूक बाँड येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गेवराई येथील पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे. या रोहित्रा वरील विद्युत तार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तुटली होती. याच दरम्यान शेतातून येणारी गाईची झुंड या परिसरात येतात. विजेचा धक्का लागल्याने एका पाठोपाठ एक अशा सात गाई मृत्युमुखी पडल्या. अचानक घडलेल्या घटनेमुळे गोंधळलेल्या शेतकऱ्यांनी इतर जनावरांना बाजूला हाक आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व विद्युत् पुरवठा बंद केला. यानंतर मूर्त काहींना बाजूला काढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

या घटनेत प्रकाश राठोड, कृष्णा पवार, संजय राठोड, दिलीप मुळे, संतोष माळवदे, अमोल केदार आदी सहा शेतकऱ्यांच्या सात गाईंचा मृत्यू झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी काळे यांनी गाईंचा पंचनामा केला या प्रकरणी अहवालानंतरच घटनेस कारणीभूत कोण आहे याची माहिती समोर येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अवलंबून असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here