‘या’ ७ जागांवर मतदान झाल्यानंतरच निकाल स्पष्ट झालाय..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राज्यात चुरशीच्या ठरतील अशा काही लढती आहेत, त्याच पद्धतीने सोपा विजय मिळेल अशाही काही जागा आहेतच.

१) वरळी – ठाकरे कुटुंबियांतील निवडणूक लढवणारा पहिला व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंनी वरळीमधून निवडणूक लढवली. प्रतिस्पर्धी फारसा तगडा नसल्याने, राज ठाकरेंनी उमेदवारच न दिल्याने इथली लढत एकतर्फी झाली.

२) अचलपूर – अपक्ष म्हणून उभे राहिलो तरी लोकांसाठी केलेल्या कामावर निवडून येता येतं याचं उत्तम उदाहरण बच्चू कडू आहेत. यंदाची निवडणूकही त्यांच्या दृष्टीने सोपीच गेल्याचं पहायला मिळालं.

३) नागपूर दक्षिण पश्चिम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ही निवडणूक जिंकण्यात येणाऱ्या अडचणी फार कमी आहेत. स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन देणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत उत्तम कामगिरी बजावली आहे.

४) बारामती – बारामतीमध्ये शरद पवारांनी २३ वर्ष आणि मी २७ वर्ष काम केल्याचं अजित पवार मागे म्हणाले होते. एवढ्या वर्षांत बारामतीमध्ये आमच्या घरातील कुणालाही पाडणं विरोधी पक्षाला शक्य झालं नसल्याचं विधानही पवारांनी केलं होतं. एकूणच दांडगा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्र या जोरावर अजित पवारसुद्धा ही निवडणूक जिंकण्यात यशस्वी होतील.

५) पलूस – कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरपरिस्थिती हाताळताना विश्वजीत कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंतगराव कदम यांच्या जाण्यानंतर आपलं स्थान राखुन ठेवण्यात विश्वजीत कदमांना तुलनात्मकरित्या कमी अडचणी आल्या आहेत. यंदाची निवडणूकही ते सहज जिंकतील.

६) लातूर ग्रामीण – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यंदा आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार प्रचारात कुठेच दिसून न आल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

७) बडनेरा – युवा स्वाभिमान पक्षातर्फे अमरावती विभागात आपल्या कामाचं मजबूत संघटन उभं केलेल्या रवी राणा यांच्यासाठीसुद्धा ही निवडणूक फिक्स जिंकल्यात जमा आहे. खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांचा मतदारसंघातील प्रचार आणि प्रभावही बोलका आहे.

Leave a Comment