धक्कादायक ! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्याच्या बहाण्याने सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यामध्ये शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने आईला बाहेर नेल्यानंतर आरोपीने घरी येऊन हे कृत्य केले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि पीडित मुलगी वाशी सेक्टर 9 या ठिकाणी राहते. सदर मुलगी दुसरीत शिकत असून तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नव्हता.यामुळे तिच्या आईने शेजारीच राहणाऱ्या कुटुंबाकडे मदत मागितली. यानंतर शेजारील दांपत्याने त्या महिलेला मोबाईलच्या दुकानात नेले. त्याठिकाणी लोनवर मोबाईल मिळवून देतो असे त्याने महिलेला सांगितले.

यादरम्यान महिलेची मुलगी घरी एकटीच असताना चेक घेण्याच्या बहाण्याने आरोपी परत घरी आला. यादरम्यान त्याने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर काही वेळाने सर्वजण घरी आले. यानंतर मुलीने आपल्याबाबत घडलेल्या प्रकारची माहिती आपल्या आईला दिली. परंतु या कुटुंबाने घाबरून पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. मात्र यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने त्यांनी वाशी पोलीसांकडे तक्रार केली. यानंतर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.