बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलांकडून मणिपूर घटनेचा तीव्र निषेध; म्हणाल्या, आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो

budhwar peth
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ४ मे रोजी मणिपूर येथे महिलांची नग्न दिंड काढण्यात आल्याची लज्जास्पद आणि चीड आणणारी घटना घडली. २ महिन्यांनी याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे अमानुष कृत्य देशासमोर आलं. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटलेले दिसत आहेत. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. आता यामध्ये पुण्यातील बुधवार पेठ येथील सेक्स वर्कर्सने देखील सहभाग नोंदविला आहे. शुक्रवारी बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांनी रस्त्यावर येत मणिपूर घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. तसेच, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली.

आम्हाला देखील एखाद्या गिऱ्हाईकाला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. असं असताना मणिपूरच्या महिलांसोबत जे घडलं ते अत्यंत चुकीच आहे. आम्ही त्यांच्या वेदना समजू शकतो. एखाद्या महिलेसोबत अशी घटना घडणे अत्यंत अमानुष आहे. म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वजणी एकत्र आलो आहोत” अशी भूमिका निषेध करणाऱ्या महिलांनी मांडली यावेळी मांडली. त्याचबरोबर, राज्यात वारंवार महिलांसोबत घडणाऱ्या अत्याचारांच्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात महिलांनी सुरक्षित राहण्यासाठी सरकारने तसे प्रयत्न केले पाहिजेत. मणिपूरमध्ये झालेल्या घटनेत जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे व त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे” अशी मागणी ही या महिलांनी केली.

दरम्यान, दोन गटातील विवादांमुळे गेल्या ४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून धिंड त्यांची धिंड काढल्याची घटना मणिपूर येथे घडली. यानंतर या घटनेचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळेच आक्रमक झालेल्या एका गटाने 19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे देखील माहिती समोर आली. आता या घटनेचा निषेध संपूर्ण देशभरातून केला जात आहे. याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.