कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरवणारा अटकेत; पोलिसांची तडकाफडकी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील राजेशनगर आणि यशवंतनगर भागातील कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरविण्याचे काम करणाऱ्या एजंटच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मनोज जाधव असे संशयिताचे नाव असून, तो ग्राहकांनाही महिलांचे फोटो पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुंटणखान्यावर ७ डिसेंबरला छापा टाकून चार दलाल आणि ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान राजेशनगर आणि यशवंतनगरातील २ वेगवेगळ्या घरांत कोलकाता आणि हैदराबाद येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या ३ महिला आणि गारखेडा परिसरातील वेश्या व्यवसाय करण्याऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तसेच यांच्याकडील दारूसह इतर साहित्य असे जवळपास एक लाख ७४ हजार ७०५ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणात दलालांनी पोलिस कोठडी दरम्यान मनोज जाधव हा ग्राहक आणत असल्याची माहिती पोलिसांना दिली. प्रोझोन मॉलचा व्यवस्थापक महंमद अर्शद व अमोल शेजूळ या दोघा ग्राहकांनादेखील मनोजनेच आणल्याची माहितीही त्यांनी दिली. मनोजला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिलेत.