लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेचे लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी ।  शहरातील रेल्वस्टेशन परिसरातील पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लॉजमध्ये नेऊन लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाविरोधात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला. व्यवसायात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे २ लाख रुपये घेऊन फसवणूकही केल्याचेही समोर आले आहे. शेख जुबेर शेख अब्दुल अजीज असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार महिला तिच्या दोन मुलासह बायजीपुरा भागात पतीपासून विभक्त राहाते. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करून तिचा उदरनिर्वाह करीत असते. आरोपी जुबेरसोबत तिची जूनी ओळख असल्याने त्याचे तिच्याघरी येणे-जाणे असायचे. या कालावधीत त्याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याचे तिला सांगितले. या व्यवसायात मोठा नफा असल्याने तुझ्याकडील पैसे गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुला दुप्पट पैसे देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने त्याला दोन लाख रुपये दिले. आणि आरोपी या महिलेला घेऊन लॉजवरील एका खोलीत नेले.

तसेच तिला गुंगीचे औषध टाकलेले ज्यूस तिला पिण्यास दिले. पीडितेने ज्यूस पिल्यानंतर ती अर्धवट बेशुद्ध झाली. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता शुद्धीवर आली तेव्हा तिला हा प्रकार लक्षात आला. यामुळे पीडितेने त्याच्याकडे याविषयी जाब विचारला असता त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे आणि तो तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने याविषयी तक्रार केली नाही.