बीड | स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने सोमवारी बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिष्यवृत्ती, ईबीसी व आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात भारतीय संविधान जळणाऱ्या देशद्रोह्यांचा जोरदार निषेध ‘एसएफआय’ ने केला.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील मागील वर्षातील शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. तसेच जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी अजूनही जाहीर केलेली नाही. या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले. तसेच दिल्ली येथे काही देशद्रोही प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रति जाळल्या आणि महापुषांबद्दल अवमान करणारे वक्तव्य केले. या घटनेचा देखील ‘एसएफआय’ ने तीव्र निषेध यावेळी केला आहे.
या आंदोलनात ‘एसएफआय’चे राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव रोहिदास जाधव, राज्य कमिटी सदस्य सुहास झोडगे, जिल्हा सचिव रुपेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष लहु खारगे, रवि जाधव, रामेश्वर जाधव, रवि राठोड, अनिल पवार, गोपाल निरडे, प्रविण चव्हाण, सुहास जायभाये, कुंडलिक खेत्री, सुहास विद्यागार, आकाश सासवडे, आकाश जाधव, कृष्णा भालेराव, नागेश माने, अनिकेत राऊत, रमेश पवार, विश्वास डीकले, आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.