‘ही’ Insurance कंपनी 1.5 लाखाहून अधिक एजंटची भरती करणार

Shriram General Insurance
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shriram General Insurance कंपनीची स्थापना भारतातील सामान्य जनतेला सेवा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. 1974 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विमा पुरस्कारांमध्ये “एक्सलन्स इन ग्रोथ अवॉर्ड” देण्यात आला आहे. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कंपनी सध्या 1.50 लाख एजंटची भरती करून क्लेम सेटलमेंटवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. श्रीराम जनरल इन्शुरन्स (SGI), श्रीराम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि दक्षिण आफ्रिकेतील सॅनलम ग्रुप यांनी राबवलेल्या एकत्रित उपक्रमा अंतर्गत पुढील काही वर्षांमध्ये व्यवसायाचा विस्तार अन्य क्षेत्रांमध्ये त्याचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सध्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 57,000 एजंट असूनत्यात अधिक स्तरावर पॉइंट ऑफ सेल्सपर्सनचा समावेश आहे.जी संख्या वाढवून येत्या काही काळात दोन लाखांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीच्या देशभरात एकूण 235 शाखा आहेत. श्रीराम जनरल इन्शुरन्स विमा कंपचे मुख्य ऑफिस जयपूर येथे स्थित आहे कंपनीला व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण लेखी प्रीमियम मध्ये गेल्या आर्थिक वर्षात 29 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2,266 कोटी रुपये झाला आहे. तर विमा उद्योगात 16 टक्के वाढ झाली आहे. श्रीराम जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनिल अग्रवाल म्हणाले की, आम्ही आमच्या व्यवसाय योजनेबद्दल खूप उत्साहित आहोत व्यवसाय वाढीच्या आम्ही ठरवलेल्या योजनेनुसार, आम्ही 1.50 लाखांहून अधिक एजंट्सची नियुक्ती करू ज्यात पॉइंट ऑफ सेल्सपर्सनचा समावेश आहे.

अग्रवाल म्हणाले की ब्रोकर्स आणि एग्रीगेटर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत आम्ही वैयक्तिक नवीन प्रीमियम वाढवण्यासाठी आमच्या एजंटवर अवलंबून आहोत. आपले मत मांडताना ते पुढे म्हणाले की, एजंट हीच आपली खरी ताकद आहे. कंपनीकडे ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांचा समावेश आपल्या व्यवसायात करून घेण्यासाठी कंपनीकडे एक विशेष मॉडेल आहे. श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीत गेल्या वर्षी सुमारे 14,000 एजंट नियुक्त करण्यात आले होते.

श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सीईओ च्या मता नुसार कंपनी केवळ एजन्सीचा विस्तार करत नाहीत तर त्यांचे कर्मचारी समूह देखील वाढवत आहेत. चालू आर्थिक वर्षात 750 आणि पुढील 3 वर्षात 5000 जणांची भरती करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीत सध्या 3750 कर्मचारी आहेत. श्रीराम जनरल इन्शुरन्स चे सॉल्व्हेंसी प्रमाण हे 1.5 टक्के च्या नियामक गरजाहुन अधिक 4.9 टक्के आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी आतापर्यंत 259 कोटी रुपये इक्विटीत गुंतवले आहेत. कंपनीने 14 वर्षात 2,200 कोटी रुपयांहून अधिक लाभांश दिला आहे.

क्लेम सेटलमेंटवर अधिक भर

अग्रवाल म्हणाले की, आम्ही आमच्या दाव्यांची पुर्तता वाढवण्यावर अधिक भर देत आहोत. त्यांचे उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांच्या नुकसानीच्या दाव्यांचा लवकरात लवकर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञानातील आमचे लक्ष प्राप्त करण्यासाठी कर्मचारी आणि एजंटची संख्या वाढवणे महत्वाचे आहे कारण हीच प्रक्रिया आमच्या व्यवसायास गती देण्यास मदत करते.