हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 च्या पार्श्वभूमीवर मुंबईत BCCI आणि IPL संघ मालकांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मेगा लिलाव आणि प्लेअर रिटेंशनचं प्रमाण याबाबत चर्चा झाली. मात्र याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्या वादावादी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव करू नये असं शाहरुखच मत होते तर नेस वाडिया हे मात्र मेगा लिलावासाठी तयार होते. याचवरुन दोघांमध्ये वाद पाहायला मिळाला.
याबाबत क्रिकबझने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की शाहरुख खान हा मेगा लिलाव आयोजित करण्याच्या बाजूने अजिबात नाही. 2025 च्या आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नको असं शाहरुखचं म्हणणं होतं. म्हणजेच काय तर प्लेअर रिटेंशनचं प्रमाण अधिक ठेवून लिलावावर कमी भर दिला पाहिजे असं असं शाहरुख खानचे मत होते तर दुसरीकडे नेस वाडिया यांचं मात्र म्हणणं वेगळंच होते. जास्तीत जास्त खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देऊ नये. मर्यादित संख्येमध्येच खेळाडू रिटेन झाले पाहिजेत आणि मेगा लिलावात जास्तीत जास्त खेळाडू उतरले पाहिजेत असं नेस वाडिया यांचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरून शाहरुख खान आणि नेस वाडिया यांच्या बाचाबाची झाल्याचेही समजते.
आता BCCI च्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. खेळाडूंचा मेगा लिलाव करायचा की नाही यावर एकमत होऊन किती खेळाडूंना कायम ठेवायचे हे ठरवले जाईल. बीसीसीआयने जर मेगा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला तर मग रिटेंशनची गरज भासणार नाही. या बैठकीनंतर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले की ते मेगा लिलावाच्या समर्थनात आहेत. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिने मात्र शाहरुख खानच्या सुरात सूर मिसळत मेगा लिलावाला विरोध केला आहे.
बैठकीला कोण कोण उपस्थित ?
BCCI सोबतच्या या या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, चेन्नई सुपर किंग्जचे रूपा गुरुनाथ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रथमेश मिश्रा आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले हे देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी हे ऑनलाईन माध्यमातून या बैठकीला उपस्थित होते.