हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 5 ऑक्टोबर पासून 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेला (Cricket World Cup 2023) सुरुवात होणार असून सर्वच संघ तयारीला लागले आहेत. एकीकडे वर्ल्प कप साठी खेळाडू नेट्स मध्ये कसून सर्व करत असतांना दुसरीकडे बांगलादेशचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) आपल्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपण क्रिकेटला रामराम ठोकणार आहोत असं शाकिबने म्हंटल आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
कर्णधार शाकिब हसन हा सध्या आपल्या संघाच्या कर्णधारपदाची भूमिका बजावत आहे. मात्र त्याने टी – स्पोर्टशी बोलताना जणू काही आपल्या निवृत्तीची तारीखच सांगून टाकली आहे. शाकिबने सांगितले की, मी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्रिकेट विश्वातुन निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे 2024 टी-20 विश्वचषक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दृष्टीने शेवटची असू शकते सं बोलून शाकिबने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काचं दिला आहे.
कर्णधारपदावरूनही होणार मागे
आपल्या निवृत्तीची घोषणा करत शाकिबने हेही सांगितले की, जरी तो 2025 नंतर निवृत्ती घेणार असला तरी 2023 च्या वर्ल्ड कप नंतर संघाच्या कर्णधार पदावरूनही पाउतार होणार आहे. तो म्हणतो ” जेव्हा तुम्ही कर्णधार असतात तेव्हा तुम्ही मोकळे पणाने खेळू शकत नाही. याउलट तुम्ही कर्णधार नसाल तर तुमच्यावर कोणती जबाबदारी नसते. तुम्ही स्वछंदपणे आपला खळे खेळू शकता. म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले.
शाकिब अल हसनने बांगलादेशकडून 2007 मध्ये भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याने आपली कामगिरी दिवसेंदिवस उंचावतच नेली आणि बांग्लादेशच्या संघाला अनेक विजय मिळवून दिले. शाकिब हा बांगलादेशचा आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. शाकिबने 66 कसोटी सामन्यात 121 डावात 39.07 च्या सरासरीने 4454 धावा केल्या आहेत. तर 233 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. तर त्याने 240 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.67 च्या सरासरीने 7384 धावा केल्या आहेत आणि 300 हून अधिक बळी घेतले आहेत. याशिवाय शाकिबने 117 टी-20 सामन्यांमध्ये 2342 धावा आणि 140 बळी घेतले आहेत.